शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पुणे जिल्हा परिषदेचं स्तुत्य पाऊल ; महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरु केला चक्क पिरीयड फ्रेंडली कक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 6:31 PM

महिला कर्मचाऱ्यांसाठी पिरियड फ्रेंडली रुम; सॅनिटरी नॅपकिनची सोय, तसेच शेकण्यासाठा पिशवी अशा अनेक सोयी

पुणे : मासिक पाळी दरम्यान जिथे अत्यावश्यक सोयींची वानवा तिथे आराम करण्यासाठी जागा मिळणे अवघडच. पण हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे तो पुणे जिल्हा परिषदेने. पुणे जिल्हा परिषदेने महिला कर्मचाऱ्यांसाठी चक्क पिरियड फ्रेंडली रुम सुरु केली आहे. या कक्षाचे उद्धाटन मंगळवारी (दि. ९) करण्यात आले. 

मसिक पाळी दरम्यान महिलांना अनेक त्रासांचा सामना करावा लागतो. कधी जास्त प्रमाणात होणारा रक्तस्त्राव तर कधी होणारी कंबर किंवा अंगदुखी. पण वर्किंग वुमन्सना पाळीच्या काळात आराम करायचा तर थेट सुट्टीच घ्यायची वेळ येते. 

काही खासगी कंपन्यांनी आता 'पिरीयड लिव्ह'ला सुरुवात केली आहे. मात्र हा ट्रेंड सगळी कडे रुजायला वेळ लागणार आहे. त्यातच हा बदल सरकारी पातळींवर होणे आणखी अवघड आहे.

पण पुणे जिल्हा परिषद मात्र याला अपवाद ठरली आहे. महिला कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी एक पाउल पुढे टाकत पिरियड फ्रेंडली कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षात आराम करण्याची सोय असणार आहेत. यासोबतच सॅनिटरी नॅपकिनची सोय, तसेच शेकण्यासाठा पिशवी अशा अनेक सोयी उपलब्ध असणार आहेत.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिला