पुणे - चीनमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचे रुग्ण भारतात आढल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. त्यातच पुण्यासह राज्याच्या काही भागात कोरोनाचे रुग्ण आढळल्यापासून संबंधित रुग्णांची माहिती उघड करण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे अशा रुग्णांच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची ओळख उघड करणाऱ्यांना सज्जड इशारा दिला आहे. कोरोनाग्रस्तांची नावे उघड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
कोरोनाचा संसर्ग झालेले काही रुग्ण आढळल्यानंतर या रुग्णांची ओळख उघड करण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे संबंधित रुग्णांच्या कुटुंबीयांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची ओळख करू नका. अशाप्रकारे रुग्णांची उघड करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसे आदेश देण्यात आले आहेत,''असे म्हैसेकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ''आज दुबईवरून येणाऱ्या प्रवाशांना खबरदारीचा उपाय म्हणून वेगळे ठेवण्यात येणार आहे. त्यांची तपासणी करण्यात येईल. मात्र या प्रवाशांच्या नातेवाईकांनी विमानतळावर येऊ नये, असे आम्ही आवाहन करतो. आज आणि उद्या जी विमाने दुबईवरून पुण्यात येत आहेत त्यांच्यासाठी हे प्रयोजन करण्यात येणार आहे.''
संबंधित बातम्या
जगातील 114 देश कोरोणाच्या विळख्यात, आता या चार मोठ्या देशांत घालतोय थैमान
Big News : मोदी सरकारमधील परराष्ट्र मंत्रालय IPL 2020 आयोजनाच्या विरोधात, पण...
दर १०० वर्षांनी जगात येते रोगाची मोठी साथ, ४०० वर्षांत ४ मोठ्या साथींनी घेतले लाखो बळीदरम्यान, ''एन 95 मास्क सगळ्यानी वापरायची गरज नाही. ज्यांनी वापरायची गरज आहे त्यांना आम्ही त्याची माहिती देऊ. भेसळ असलेले हँड सॅनिटाईझर बाजारात आल्यास सक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी हात स्वच्छ धुतले तरी पुरेसे आहे.''अशी माहितीही त्यांनी पुढे दिली.