चांदखेड : डोणे खिंड, आढले बुदु्रक येथे आयोजित भागवत कथा सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने रविवारी सांगता झाली. हभप हरिहरजीमहाराज दिवेगावकर यांनी भागवत कथेचे निरूपण केले. आयोजन पै. सचिन घोटकुले स्पोटर््स फाउंडेशन आयोजित भागवत कथेमध्ये हरिहरजीमहाराजांनी विविध कथांवर निरूपण केले. पवन मावळ विभागातील ५० गावांमधील ४०० वारकऱ्यांचा सोहळ्यात सत्कार करण्यात आला. सोहळ्यामध्ये माजी आमदार दिंगबर भेगडे, तळेगावचे उपनगराध्यक्ष गणेश खांडगे, गणेश काकडे, संत तुकाराम कारखान्याचे माजी संचालक राजाराम राक्षे, माऊली ठाकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, जयहिंद बँकेचे संचालक गुलाब वाघोले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरत शिंदे, ज्ञानेश्वर आडकर, किसन कदम, भाऊसाहेब पानमंद, उत्तम बोडके, राष्ट्रवादी युवकचे संतोष मुऱ्हे, सुनील दाभाडे, बाळासाहेब गायकवाड, चंद्रकांत दहिभाते, अॅड. खंडुजी तिकोणे, नामदेव ठुले आदी उपस्थित होते. सप्ताहात रोज धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भागवत कथेचे श्रवण करण्यासाठी पवन मावळात भाविकांची रोज गर्दी होत होती. संयोजनपरिसरातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.(वार्ताहर)
पुणेकरांनी अनुभवली सुरेल तालांची सफर
By admin | Published: March 01, 2016 12:51 AM