शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

पुणेकरांनो, सावधानता बाळगा, स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 12:52 AM

शहरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेवला आहे.

पुणे : शहरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाने संसर्गजन्य आजार होऊ नयेत, म्हणून नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.शहरात सध्या स्वाइन फ्लू व डेंग्यूचे संशयित रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. स्वाइन फ्लू हा संसर्गजन्य आजार असल्याने योग्य काळजी न घेतल्यास त्याचा प्रसार लगेच होतो. दि. १ जानेवारीपासून आतापर्यंत ११९ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (दि.८) २ हजार ५९० संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १०१ रुग्णांना टॅमी फ्लू गोळ्या देण्यात आल्या. तर ३७ रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून १२ रुग्णांना लागण झाल्याचे तपासणीत आढळून आल्याचे आरोग्य अधिकारीडॉ. अंजली साबणे सांगितले.े पिंपरींमध्येही स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होऊन रुग्णांची संख्या १०२ झाली आहे. स्वाइन फ्लूने आतापर्यंत १४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (दि.७) १२ आणि शनिवारी (दि.८) ३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे रुग्णांच्या संख्येने शंभरी ओलांडली आहे. दोन दिवसांत तब्बल १५ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे.>अशी घ्या काळजीस्वाइन फ्लूची लक्षणे असल्यासगर्दीत जाणे टाळा.ताप, सर्दी, खोकला झाल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.मधमेह, हृदयरोग यांसारखे आजार असलेल्या व्यक्ती तसेच पाच वर्षांखालील मुले, गर्भवती महिलांनी अधिक काळजी घ्यावी.हात वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने धुवावेत.पौष्टिक आहार घ्या.लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात वापर करा.भरपूर पाणी प्या.शिंकताना, खोकताना नाका-तोंडावररुमाल ठेवा.सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.>स्वाइन फ्लूची लक्षणेताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, सर्दी, अंगदुखी, डोकेदुखी

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लू