घोडेगाव : माळीण दुर्घटनाग्रस्त बांधवांना मानसिक व भावनिक आधार देण्यासाठी पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या ‘चला माळीण उभारू या’ या प्रकल्पांतर्गत यंदा माळीण ग्रामस्थांसमवेत पुणेकरांनी पत्र्याच्या तात्पुरता निवारा शेडमध्ये दिवाळी सण साजरा केला. पुण्यातील कै. शंकरराव भोई प्रतिष्ठान दोन वर्षांपासून हा उपक्रम राबवीत आहे. त्याचे हे तिसरे वर्ष होते. डॉ. मिलिंद भोई यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील विविध गणेशोत्सव मंडळे, स्वयंसेवी संस्था व काही पुणेकरांनी यामध्ये सहभाग घेऊन माळीणकरांबरोबर दिवाळी साजरी केली. भोई प्रतिष्ठान माळीणवासींसाठी रक्षाबंधन व दिवाळी असे दोन सण साजरे करते. यापूर्वी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, अभिनेता विक्रम गोखले, अभिनेत्री अलका कुबल, कीर्तनकार चारुदत्त आफळे, अच्युत गोडबोले आदी मान्यवरांनी सहभागी होऊन माळीणवासीयांशी संवाद साधला आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लोककलावंत अभय नलगे, हरिदास शिंदे, अभिनेत्री जयमाला इनामदार, गायक इक्बाल दरबार यांनी संगीतमय मैफिलीचा कार्यक्रम सादर केला. (वार्ताहर)माळीणवासींच्या पत्र्याच्या घरांना फुलांचे तोरण लावले, आवडीने बनविलेला प्रेमाचा-स्रेहाचा फराळ दिला, नवीन कपडे, सुवासिक तेल, उटणे, रांगोळी, पणत्या, आकाशकंदील, लहान मुलांसाठी किल्ला, चित्रे त्यांना दिली आणि या सर्वांच्या जोडीला कलाकारांनी सादर केलेला संगीतमय कार्यक्रम घेऊन खऱ्या अर्थाने माळीणकरांची दिवाळी साजरी केली. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लोककलावंत अभय नलगे, हरिदास शिंदे, अभिनेत्री जयमाला इनामदार, गायक इक्बाल दरबार यांनी संगीतमय मैफिलीचा कार्यक्रम सादर केला.
माळीणकरांबरोबर पुणेकरांनी साजरी केली दिवाळी
By admin | Published: October 26, 2016 5:42 AM