पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि.१) पुणे दौऱ्यामध्ये पुुणे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करू नये असे आदेश जलसंपदा विभागाच्या सचिवांना दिले. परंतु शुक्रवारी सायंकाळपर्यंत या संदर्भातील कोणत्याची सूचना अथवा लेखी पत्र महापालिका प्रशासनाला मिळाल्या नाहीत. यामुळे सध्या तरी पुणेकरांची दिवाळी पाण्याविनाच जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. १) पुण्याच्या प्रश्नासंदर्भात महापालिकेतील पदाधिकाºयांबरोबर चर्चा केली. या वेळी पुणे शहरातील गंभीर बनलेल्या पाणीपुरवठ्यासंदर्भात पदाधिकाºयांनी मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. पुणे शहराची लोकसंख्या लक्षात घेता पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे शहराला वाढीव पाणी मिळण्याची मागणी या वेळी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या सचिवांना शहराच्या पाणी पुरवठ्यात कोणतीही कपात न करता दररोज पूर्वीप्रमाणेच १३५० एमएलडी पाणी देण्याचे आदेश दिले असल्याची माहिती सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर १३५० एमएलडी पाणी मिळणार आहे. त्यामुळे वेळापत्रक बदलाची वेळ आल्यास यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दिवाळीपूर्वी वेळापत्रकात बदल होणार नाही. दिवाळीच्या महापालिकेला सुट्या असल्यामुळे नवीन बदल करणे शक्य नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
पुणेकरांची दिवाळी जाणार पाण्याविनाच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 2:34 AM