शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

पुणेकरांनी केली वारकऱ्यांची सेवा

By admin | Published: June 20, 2017 6:54 AM

लष्कर भागात पालखीतील दिंडीकऱ्यांचे विविध सार्वजनिक गणेश मंडळ आणि संस्थांनी स्वागत केले. ‘ग्यानबा-तुकारामां’च्या जयघोषात पुणे लष्करभागात ज्ञानेश्वर महाराज

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : लष्कर भागात पालखीतील दिंडीकऱ्यांचे विविध सार्वजनिक गणेश मंडळ आणि संस्थांनी स्वागत केले. ‘ग्यानबा-तुकारामां’च्या जयघोषात पुणे लष्करभागात ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराममहाराज यांच्या पालख्यांमधील दिंडीकऱ्यांचे सार्वजनिक गणेश मंडळ आणि विविध सामाजिक संस्थांनी स्वागत केले. यामध्ये खाण्या मारुती मंदिरात संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या पालखीतील श्रीसमर्थ सद्गुरू योगीराजमहाराज दिंडी क्र. ४२ मधील वारकरी बांधवांचे स्वागत केले. या वेळी वारकऱ्यांसाठी निवाऱ्याची सुविधा करण्यात आली, सायंकाळी अन्नदान करून भजन झाले.भीमपुरा गल्लीमधील हिंद बाल मित्रमंडळ : संत तुकाराममहाराज पालखीमधील दिंडी क्र. १०३ मधील वारकरी बांधवांना अन्नदान केले. या वेळी भजनाचा कार्यक्रम झाला. या वेळी संजय परदेशी, नीलेश बेलमपेल्ली, प्रशांत भंडार, गौरव परदेशी आदी उपस्थित होते.हिंद तरुण मंडळ : संत ज्ञानेश्वर महाराज पालखीमध्ये वारकरी बांधवांचे स्वागत केले. मंजितसिंग विरदी फाउंडेशनच्या वतीने वारकरी बांधवांना पाण्याच्या बाटल्यांचे वाटप व फळे वाटप करण्यात आले. सत्तावीसा जैन सिटी गु्रप : भवानी पेठ हमाल पंचायतीशेजारी श्री सत्तावीसा भवनात मोफत आरोग्य शिबिर, औषध वाटप आणि चष्मे वाटप झाले. या शिबिराचे उद्घाटन अ‍ॅड. सोहनलाल ओसवाल यांच्या हस्ते झाले. या वेळी भरत सोळंकी, किरण डूमावत, जसवंत सिरोहिया आदी उपस्थित होते. नवयुवक तरुण मंडळ व युवावर्ग प्रतिष्ठानच्या : वतीने पाचशे वारकरी बांधवांना दैनंदिन वापराच्या वस्तू साबण, शाम्पू, कंगवा आदींचे वाटप चेतन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी विराज काकडे, नईम शेख, महेश इगवे आदी उपस्थित होते. संचेती ट्रस्टतर्फे चिक्कीचे वाटपलोकमत न्यूज नेटवर्कपुणे : (स्व.) इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्ट व ओम गुरू आनंद गोशाळा मावडी (सासवड) यांच्या वतीने मार्केट यार्ड येथे वारकऱ्यांना चिक्की व लाडूचे वाटप करण्यात आले.दर वर्षी मार्केट यार्डातील व्यापारी हजारो वारकऱ्यांसाठी जेवण, फळेवाटप, आरोग्य शिबिर, विविध वस्तूंचे वाटप असे उपक्रम घेत असतात. संचेती ट्रस्टच्या वतीनेदेखील दर वर्षी वेगळा उपक्रम या माऊली भक्तांसाठी घेतला जातो. या वेळी ट्रस्टचे अध्यक्ष अभय संचेती यांनी सांगितले की, वारकऱ्यांच्या आगमनामुळे पुणे शहराचे पुण्यनगरीमध्ये रूपांतर होत असते. हे वारकरी करीत असलेल्या हरिनामाच्या गजरामुळे या शहराचे वातावरण हरिमय होऊन जाते. वारकरी हा विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक कष्ट, यातना घेत जात असतो. वाटेमध्ये त्यांना अनेक अडचणी येत असतात. या वेळी अभय संचेती, मनीष संचेती, पन्नालाल संचेती, विजय शिंगवी, राजू काग, दर्शन शिंगवी, वैभव लोढा, हरकचंद देसरडा, सुरेश वानगोता, सचिन देसरडा, धरमचंद छाजेड, विकास सावंत, सूर्यकांत झेंडे, सतीश लुणिया, सनी गुप्ता, प्रमोद जगताप, मंगेश पाबळे यांच्यासह मार्केट यार्डातील अनेक व्यापारी उपस्थित होते. मुस्लिम बांधवांकडून वारकऱ्यांची सेवाशहरातील मुस्लिम बांधवांनी वारकऱ्यांना अल्पोपाहार आणि पाण्याचे वाटप करून सेवा केली. रिझवानी मस्जिद तलवार ताबूत ट्रस्टसह येवलेवाडी, लष्कर, डेक्कन आणि पूलगेट भागातील मुस्लिम बांधवांनी पालख्यांचे स्वागत केले. रिझवानी मस्जिद ट्रस्टच्या वतीने गंज पेठेमध्ये पालख्यांचे स्वागत करण्यात आले. सर्व ईश्वर एकच आहे. सर्व जनता माऊलींचीच आहे. मानवता हाच सर्वांत मोठा धर्म असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष हाजी अंजूम शेख म्हणाले. यावेळी उस्मान गनी अरब, नईम तांबोळी, मतीन मुजावर, नईम शेख, इक्बाल शेख, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेविका आरती कोंढरे, नगरसेवक अजय खेडेकर, सम्राट थोरात उपस्थित होते. तर येवलेवाडी, लष्कर, डेक्कन, पूलगेट येथे अयाझ पठाण, संजय जगताप, सुदाम धांडेकर, अक्रम पठाण, अनिस पठाण, दिलावर पानसरे यांनी वारकऱ्यांची सेवा केली.