शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

पाऊस लांबल्याने पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार, महापौरांची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 9:43 PM

पालिकेतील पक्षनेत्यांची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीला महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते

पुणे : खडकवासला धरणामधील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने पालिकेने दहा टक्के पाणी कपात सुरू केली आहे. दररोजच्या पाणी पुरवठ्यामधून ही कपात सुरु असून आवश्यकता भासल्यास एक दिवसाआड पाणी पुरवठा करावा लागेल असे सूतोवाच पालिका आयुक्त सौरभ राव यांनी शुक्रवारी झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये केले. त्यामुळे आगामी काळात पुणेकरांना पाणी कपातीला तोंड द्यावे लागेल अशी चिन्हे आहेत. 

पालिकेतील पक्षनेत्यांची शुक्रवारी बैठक पार पडली. या बैठकीला महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनिल कांबळे, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, सेनेचे गटनेते संजय भोसले, आरपीआयच्या सुनिता वाडेकर, मनसेचे वसंत मोरे, एमआयएमच्या अश्विनी लांडगे यांच्यासह आयुक्त सौरभ राव व पालिकेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शहरातील पाणी पुरवठ्यामध्ये कपात सुरु करण्यात आली आहे असा प्रश्न  विचारण्यात आला. तेव्हा दहा टक्के पाणी कपात सुरु करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली. 

पुण्याच्या पूर्व भागामध्ये पाणी कमी दाबाने येत असून त्यामुळे याभागातील अडचणी वाढल्या आहेत. त्यावेळी याविषयाचा खुलासा झाला. धरणामध्ये २.२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. तर आगामी पालखी, बाष्पीभवन आणि दौंडसाठी १.२ टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे निम्म्या पुण्याला एक दिवसाआड पाणी द्यावे लागणार आहे. त्यामुळे पालिका दररोज १३५० एमएलडी पाण्याचा पुरवठा करते. हा पुरवठा १११५ एमएलडीवर आणण्यात आला आहे. आणखी आठ दिवस पावसाची वाट पाहून एक  दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. या काळात पाऊस झाला तर कदाचित हा निर्णय घेतला जाणार नाही. याबाबत उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांची भेट घेऊन पाणी कपात सुरु केली आहे का अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी पालिकेला 31 जुलैपर्यंत ठरवून दिलेल्या कोट्यानुसारच पाणी दिले जाणार आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची कपात जलसंपदा विभागाने केलेली नाही असे स्पष्ट केले. 

कडक उन्हामुळे पाण्याची मागणी वाढू लागली असून धरणामधील पाणी साठा कमी होऊ लागला आहे. संभाव्य पाणी टंचाईचा विचार करुन वडगाव जलशुद्धीकरण केंद्राकडून पुण्याच्या दक्षिण भागामध्ये आठवड्यामधून एक दिवस पाणी पुरवठा बंद केला जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १० जूनपासून केली जाणार आहे. रविवार : बाबुराव सणस विद्यालय परिसर, उत्कर्ष सोसायटी परिसर, लेन नं. १ ते २७ परिसर, चव्हाणबाग, डि. एस. के. वेंकटेश सेव्हींग परिसर, हायब्लीस सोसायटी परिसर इ. धायरी. सोमवार : भारती विापीठ परिसर, चंद्रभागा नगर, फालेनगर, बाळकृष्ण सोसायटी, राजमुद्रा सोसायटी,

अक्षय नगर, आंबेगाव पठार स.नं. १५ ते स.नं. ४१. इ.मंगळवार : सुदत्त संकुल परिसर, तुकाईनगर परिसर, दामोदरनगर परिसर, दामोदरनगर परिसर, विश्रांतीनगर परिसर, गोयल गंगा, आनंद विहार, सनसिटी, हिंगणे इ. परिसर, इ.बुधवार : सहकारनगर, धनकवडी गाव, स. नं. २, ३, बालाजीनगर इ.गुरूवार : कात्रज गाव, गुजरवाडी फाटा, निंबाळकर वस्ती, गोकुळनगर, शिवशंभो नगर, भारतनगर,राजस सोसायटी, भूषण व इंद्रप्रस्थ सोसायटी, सुखसागर नगर भाग १ व भाग २. इ.शुक्रवार : संतोषनगर, दत्तनगर, आंबेगाव खुर्द, अंजलीनगर, जांभुळवाडी रस्ता, टेल्को कॉलनी, लेक -विस्टा सोसायटी परिसर, इ.शनिवार : राजीव गांधी नगर, चैत्रबन वसाहत, पद्मावतीनगर, अंबिका नगर, पवन नगर, श्रेयस नगर,काकडे वस्ती, अशरफ नगर, ग्रीन पार्क, हगवणे वस्ती, कोंढवा बुद्रुक गाव, पुण्यधाम आश्रमरस्ता, कामठेनगर, बधे वस्ती, टिळेकरनगर, साईनगर, गजानन नगर, येवलेवाडी, इ.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणेMayorमहापौरMukta Tilakमुक्ता टिळक