शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

पुणेकरांनो; आता चुकीला माफी नाही! घराबाहेर पडलात तर होणार कारवाई..... 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 3:59 PM

सतत आवाहन करून देखील नागरिकांकडून बेशिस्तपणा...

ठळक मुद्देपोलीस उपआयुक्त डॉ रवींद्र शिसवे यांचा आदेश 

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांना सतत आवाहन करून देखील त्यांच्याकडून बेशिस्तपणा होत आहे. ते बेजबाबदारपणे घराबाहेर पडत असून आपल्याबरोबरच इतरांचाही जीव धोक्यात घालत आहेत.यामुळे येत्या 14 एप्रिलपर्यत कुणी व्यक्ती फिरण्यास, वाहतुकीस मज्जाव केलेल्या क्षेत्रात आढळल्यास त्याच्यावर फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 144 (1) आणि (3) नुसार कारवाई करण्यात येणार आहे. अशा आदेश पोलीस उपायुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी काढले आहे. यामुळे शहरात निर्बंध घालण्यात आलेल्या भागात फिरताना दिसल्यास संबंधित व्यक्तीवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला आहे. तो रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी नागरिकांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्यानंतरही त्यांच्याकडून सूचनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शहरातील खडक पोलीस स्टेशन, फरासखाना पोलीस स्टेशन, स्वारगेट आणि कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व परिसर हा सील करण्यात आला आहे. त्या भागातून नागरिकांना फिरण्यास, वाहतुकीस पूर्णत: मनाई करण्यात आली आहे. तरीदेखील अनेक बेजबाबदार नागरिक पोलिसांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. यामुळे डॉ. शिसवे यांनी आता सील करण्यात आलेल्या भागात फिरताना अथवा वाहतूक करताना आढळल्यास त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाचा संसर्ग व प्रसार होऊ नये यासाठी 22 मार्च पासून संचारबंदी व जमावबंदीचे आदेश शहरातल्या वेगवेगळ्या भागात देण्यात आले आहेत. मात्र सध्या कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने त्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याने पोलीस प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात आली आहेत. त्याकरिता नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

शहरातील पूर्व भागात आता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन वेळीच उपाययोजना न केल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. यामुळे त्या भागात पूर्णत: संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर सक्त कारवाईचे आदेश संबंधित पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. या नियमांमध्ये ज्याठिकाणी पूर्णत: संचारबंदी केली आहे त्या भागातल्या रस्त्यावर, गल्लोगल्ली फिरताना, वाहन घेऊन उभे असल्यास, थांबून राहिल्यास, कुणाशी बोलत असल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

* संचारबंदी लागू करण्यात आलेली ठिकाणे: 1. खडक पोलीस स्टेशन - या भागातील मक्का मस्जिद, यादगार बेकरी ते दलाल चौक, मोहसीन जनरल स्टोअर्स - शमा फॅब्रिकेशन -शहीद भगतसिंग चौक - उल्हास मित्रमंडळ - राजा टॉवर - इम्युनल चर्चची मागील बाजू - हाजी इसाक शेख उद्दीन मार्ग - महाराणा प्रताप रोड - मिठगंज पोलीस चौकी - रॉयल केटरस समोरील बोळ - चांदतारा चौक - घोरपडे पेठ पोलीस चौकी - इकबाल स्क्रप या ठिकाणाचा समावेश करण्यात आला आहे. 2. फरासखाना पोलीस स्टेशन - मंगळवार पेठ, कागदीपुरा 330, मंगळवार पेठ 157, मंगळवार पेठ -  गाडीतळ चौक -  कामगार पुतळा 220, मंगळवार पेठ 224, मंगळवार पेठ 226 यांचा समावेश करण्यात आला आहे. 3. स्वारगेट पोलीस स्टेशन * मीनाताई ठाकरे वसाहत कमान - महर्षीनगर पासून ते गिरीधर भवन चौकापर्यतच्या रस्त्याचा डावीकडील भाग * महावीर प्रतिष्ठानापासून राधास्वामी सत्संग व्यासकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूस असलेल्या सूर्यमुखी गणेश मंदिरापासून पुढे राधास्वामी सत्संग व्यासपर्यतची डावीकडील बाजू* डायस प्लॉट ते सेव्हन लव्हज चौकाकडे जाणाऱ्या स्त्यावरील डायस प्लॉट पर्यतचा उजवीकडील भाग तसेच डायस प्लॉट चौकाकडून लक्ष्मी नारायण चौकाकडे (सातारा रस्ता) जाणाऱ्या रस्त्याचा मीनाताई ठाकरे वसाहत कमानपर्यतचा डावीकडील भाग * गिरीधर भवन चौक ते डायस प्लॉट या रस्त्याच्या उजव्या व डाव्या बाजूचा भाग * डायस प्लॉट चौक ते राधास्वामी सत्संग दरम्यानचा रस्ता 4. कोंढवा पोलीस स्टेशन अशोका म्युज सोसायटी - आशीर्वाद चौक, मिठानगर - सत्यानंद हॉस्पिटल गल्ली - भैरोबा मंदिर पीएमटी बस स्टॉप, संत गाडगे महाराज शाळा - साई मंदिर ब्रम्हा अमन्यू सोसायटी - शालिमार सोसायटी - कुमार पृथ्वी गंगांधाम रोड - मलिक नगर या भागाचा समावेश करण्यात आला आहे. *  मनाईचा आदेश यांना नसेल ...पोलीस, संरक्षण दल, आरोग्य विभाग, दवाखाना, औषधालय, अत्यवस्थ रुग्णाची वाहतूक, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना संबंधीत पुणे महानगरपालिका व शासकीय सेवा, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांना या मनाईच्या आदेशातून वगळण्यात आले आहे. 

* दोन तासांसाठी दैनंदिन जीवनावश्यक वस्तू व सेवा उपलब्ध होतील...प्रतिबंधित भागातील जीवनावश्यक वस्तू व सेवा ( दूध दुग्धजन्य पदार्थ,  किराणामाल,  भाजीपाला) हा  दिवसभरात केवळ दोन तास सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत ग्राहकांना विक्रीसाठी सुरू ठेवता येणार आहे. याबाबत सविस्तर उद्घोषणा करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तू व सेवा पुरवणाऱ्या केंद्रांच्या ठिकाणी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जाणीवपूर्वक गर्दी टाळावी त्यासाठी आवश्यक सामाजिक अंतराचे भान ठेवावे अन्यथा पोलिसांकडून संबंधित  दुकाने बंद करण्यात येणार आहे. आणि  नागरिकांना घरी परत पाठवले जाईल.  ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध न झालेल्या कालावधीची भरपाई देण्याची तजवीज आवश्यकतेनुसार ठेवली जाईल. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या बँकिंग सुविधांसाठी सर्व बँकांनी आपली केवळ एटीएम केंद्रे कार्यान्वित ठेवावीत. सर्व संबंधितांनी कोरुना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून सूचित केलेल्या खबरदारीच्या उपायांचे उदाहरणार्थ मास्क अँड लॉज वापर तसेच सामाजिक आंतर काटेकोर सूचनांचे पालन करावे. असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस