पुणे : पुणे तिथे काय उणे असे आपण नेहमीच ऐकत असतो, पुणेकरांच्या नामी शकलांचे अनेक किस्से अापल्याला माहित आहेत. पुण्यातील अश्याच स्नॅक्स सेंटरची कहाणीच निराळी आहे. येथे ऑर्डर दिल्यानंतर तुमची ऑर्डर चक्क हवेतून येते. टिळक रोडवरील उदय विहार मध्ये हि पद्धत पाहायला मिळते. पुण्यातील स.प. महाविद्यालयाच्या समाेर हे स्नॅक्स सेंटर अाहे. 1956 झाली हे स्नॅक्स सेंटर सुरु करण्यात अाले हाेते. स.प. महाविद्यालयाच्या मुलांचा हा हक्काचा कट्टा अाहे. इडली-सांबार, पाेहे, मिसळ आणि एसपीडीपी येथील खासियत अाहे. दुनियादारी या गाजलेल्या कादंबरीमध्ये सुद्धा या उद्यविहारचा उल्लेख अाढळताे. सुरुवातीला 150 मुले एकाचवेळी बसू शकतील एेवढे माेठे हे स्नॅक्स सेंटर हाेते. अाता मात्र छाेट्याश्या जागेत हे स्नॅक्स सेंटर सुरु अाहे. आणि या छाेट्याश्या जागेतच या स्नॅक्स सेंटरचे वैशिष्ट अाहे. तुम्ही एखादी अाॅर्डर दिली की या स्नॅक्स सेंटरचे मालक उदय लवाटे हे शेजारील बेल वाजवतात. बेल वाजली की या स्नॅक्स सेंटरच्या मागच्या इमारतीमधील खिडकीत स्नॅक्स तयार करणाऱ्या काकू येतात. लवाटे काका त्यांना अाॅर्डर सांगतात. ती अाॅर्डर तयार झाल्यानंतर ती दाेन इमारतींच्या मध्ये बांधण्यात आलेल्या दाेरीच्या माध्यमातून पाठवण्यात येते. त्यानंतर काका ती तुम्हाला सर्व्ह करतात. या स्नॅक्स सेंटरची जागा कमी असल्याने याचे किचन मागच्या बाजूला असलेल्या इमारतीमध्ये अाहे. त्यामुळे तयार झालेली अाॅर्डर मागच्या इमारतीत जाऊन घेऊन येण्यापेक्षा काकांनी ही नामी शक्कल लढवली अाहे. अनेक प्रसिद्ध व्यक्तीमत्वांचा असा हा हक्काचा कट्टा हाेता अाणि अजूनही अाहे. अाता जागा कमी झाली असली तरी नागरिकांचा प्रतिसाद अजूनही तसाच अाहे.