शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

पुणेकरांचे आस्तेकदम...

By admin | Published: July 12, 2016 2:10 AM

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कार्यालयांकडे निघालेल्या पुणेकरांचा सोमवारी खोळंबा झाला. एकीकडे सकाळी नऊपासूनच मंदावलेल्या वाहतुकीमुळे वाहनांच्या लांबच

पुणे : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कार्यालयांकडे निघालेल्या पुणेकरांचा सोमवारी खोळंबा झाला. एकीकडे सकाळी नऊपासूनच मंदावलेल्या वाहतुकीमुळे वाहनांच्या लांबच लांब लागलेल्या रांगा आणि दुसरीकडे जोरदार कोसळणाऱ्या पावसाच्या सरींमुळे पुणेकरांची दमछाक झाल्याचे चित्र संपूर्ण शहरात दिसून आले. विशेष म्हणजे संभावित वाहतूककोंडी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांची उपस्थिती जवळपास प्रत्येक चौकात दिसत असतानाही, बेशिस्त पार्किंग, वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांमुळे या कोंडीत आणखीच भर पडल्याचे दिसत होते. कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, गणेश खिंड रस्ता, पाषाण, जुना पुणे-मुंबई महामार्ग, औंध, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, नगर रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, नेहरू रस्ता, फर्ग्युसन रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, भांडारकर रस्ता, या प्रमुख रस्त्यांवर तर वाहनांच्या लांबच लांब रांगा दुपारी एकपर्यंत होत्या. रविवारी मध्यरात्रीपासूनच पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने शहरात अनेक चौकांमध्ये पाण्याची तळी साचलेली होती. त्यातच रस्त्यांच्या कडेला चिखल आणि खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने दुचाकी चालकांनाही रस्त्याच्या कडेने जाणे शक्य नसल्याने एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वाहने मुख्य रस्त्यावर आली होती. त्यात दुहेरी वाहतूक असलेल्या अनेक रस्त्यांवर समोरून येणाऱ्या वाहनांकडून लेन कटिंग करून वाहने आडवी आणली जात असल्याने दुसऱ्या बाजूचेही रस्ते वाहतुकीसाठी बंद झाल्याचे चित्र विधी महाविद्यालय रस्ता, प्रभात रस्ता, टिळक रस्ता या ठिकाणी दिसून आले. त्यामुळे अनेकांनी मिळेल त्या रस्त्याने कार्यालय गाठले. पोलीस असूनही खोळंबासंततधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणचे वाहतूक नियंत्रक दिवे बंद होते. त्यातच आठवड्याचा पहिलाच दिवस असल्याने होणारी संभाव्य वाहतूककोंडी लक्षात घेऊन अनेक ठिकाणी सकाळपासूनच वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही बेशिस्त वाहनचालक आणि रस्त्याच्या कडेला साठलेले पाणी तसेच खराब रस्त्यांमुळे वाहनांचा वेग मंदावल्याने सर्वच ठिकाणी वाहतूककोंडी दिसून आली. अनेक ठिकाणी वाहतूक नियंत्रक दिवे सुरू असूनही बहुतांश वाहनचालक पोलिसांच्या समोरच लाल सिग्नल लागल्यानंतरही वाहने घेऊन जात असल्याने इतर वाहनांना अडथळे निर्माण होत असल्याचे चित्र होते. सिंहगड रस्ता, कर्वे रस्ता, विद्यापीठ रस्ता, बाजीराव रस्ता तसेच शिवाजी रस्त्यावर रिक्षाचालक वाहतूक कोंडीतही प्रवासी घेण्यासाठी चौकाच्या परिसरात गर्दी करत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर पोलीस असूनही वाहतुकीचा खोळंबा असल्याचे चित्र होते.पावसाने अनेकांची तारांबळ उडालीरात्रभर सुरू असलेल्या पावसाने सकाळी आठनंतर काही वेळ विश्रांती घेतली होती. त्यामुळे दुचाकी काढून कार्यालय गाठण्याच्या लगबगीने अनेक जण बाहेर पडले होते. मात्र, सकाळी साडेनऊनंतर पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. जवळपास तासभर या पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे अचानक आलेल्या या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. रेनेकोट घातलेल्यांचा पावसातही प्रवास सुरू होता. जागा मिळेल तिथे थांबून पावसाचा जोर ओसरण्याची वाट पाहावी लागली. अनेकांनी तर वाहने रस्त्यावरच लावून रिक्षाने पुढचा प्रवास करत कार्यालय गाठले.