'पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही'; अजित पवारांची विनोदात्मक टोलेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 10:38 AM2021-08-20T10:38:53+5:302021-08-20T10:39:06+5:30

कार्यक्रम स्थळाच्या जागेच्या नावाबद्दल बोलताना त्यांनी केले पुणेकरांच्या स्वभावाचं वर्णन

'Punekars did not leave out the gods while naming'; Ajit Pawar's | 'पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही'; अजित पवारांची विनोदात्मक टोलेबाजी

'पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही'; अजित पवारांची विनोदात्मक टोलेबाजी

googlenewsNext
ठळक मुद्दे अजित पवारांच्या फटकेबाजीने भल्या सकाळी पुणेकर हास्यात गेले दंगून

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोना आढावा बैठकीसाठी आज पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांच्या हस्ते पुण्यात संजीवन उद्यानाचा भूमीपूजन सोहळा पार पडला. वारजे परिसरात वन विभागाच्या जागेवर हे उद्यान साकारणार आहे. सकाळी सात वाजता अजित पवार कार्यक्रमस्थळी हजर झाले.

त्या जागेच्या नावाबद्दल बोलताना त्यांनी पुणेकरांच्या स्वभावाचं वर्णन केलं आहे.'पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही, असं म्हणत त्यांनी पुण्यातील सोट्या म्हसोबा, उपाशी विठोबा ते भिकारदास मारुती, अशा देवांची नावे सांगितली. आणि जोरदार विनोदात्मक टोलेबाजी केली आहे.' 

“नावं ठेवण्यात पुणेकरांचा हात कुणीही धरु शकणार नाही. आता जिथे हा कार्यक्रम होतोय तिथे जुन्या काळी विचित्र अपघात, खून मारामाऱ्या होत असायचे. तसंच या भागात रान डुकरांचा जास्त वावर होता. याभागाला ‘डुक्कर खिंड’ असं म्हटलं जातं. तसंच पुण्यातील अनेक ठिकाणांना अशाच प्रकारची नावं आहेत. पुणेरी पाट्यांचं कुतूहल सगळीकडे आहे. अशा प्रकारे पुणेकरांच कौतुकही त्यांनी यावेळी केलं आहे अशा फटकेबाजीने भल्या सकाळी पुणेकर हास्यात दंगून गेले.

'पुण्यात काय म्हणतात, पासोड्या मारुती, सोट्या म्हसोबा… नुसता म्हसोबा नाही-सोट्या म्हसोबा, खुन्या मुरलीधर, उपाशी विठोबा, ताडीवाला दत्त, डुल्या मारुती, जिलब्या मारुती, भिकारदास मारुती पुणेकरांनी नावं ठेवताना देवांनाही सोडलं नाही. पुणेरी पाट्याचं कुतूहल सगळ्यांना आहे. त्यापाठीमागे पुणेकरांची असलेली कल्पना, निश्चित पुणेकरांचा हात कुणी धरु शकणार नाही, हे मी आपल्या सगळ्यांना गॅरंटीने सांगतो. जिथे देवांना सोडलं नाही तिथे माणसांची, ठिकाणांची काय कथा”, असंही यावेळी ते म्हणाले आहेत.   

Web Title: 'Punekars did not leave out the gods while naming'; Ajit Pawar's

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.