पुणे: पुणे आणि पिंपरी येथे सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया टप्या टप्याने सुरू करण्यात येणार आहे. सध्या निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडत आहे. गर्दी अशीच वाढत राहिली तर नाईलाजास्तव काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना दिला आहे. त्यामध्ये एका बाजूची दुकाने दिवसाआड सुरू ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागेल. हे टाळण्यासाठी नागरिकांनी विनाकारण बाहेर न पडता तसेच गर्दी न करता कोरोना रोखण्यासाठी आवश्यक नियमांचे पालन करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.
पुणे जिल्हा परिषदेत शिवराज्याभिषेक कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पवार म्हणाले, शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. सध्या शहराचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे, याचा अर्थ कोरोना पूर्ण संपला आहे असा होत नाही. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. असेही ते म्हणाले आहेत.
नाईलाजाने एका बाजूची दुकाने दिवसाआड सुरू ठेवणार
अनेक दिवसांपासून सर्व बंद असल्याने नागरिक कंटाळले आहेत. त्यांची कामे रखडली आहेत. त्यामुळे नागरिक बाहेर पडत आहे. शहरातील दुकाने सुरू करताना व्यापाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर ती सुरू करण्यात आली. मात्र सध्या या दुकानासमोर होणारी गर्दी आणखी वाढत असल्याचे दिसून आल्यास नाईलाजाने एका बाजूची दुकाने दिवसाआड सुरू ठेवावे लागतील. या बाबत व्यापाऱ्यांशी पुन्हा चर्चा केली जाईल. ही वेळ येऊ न देण्यासाठी व्यापारी आणि नागरिकांनी गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे पवार यांनी सांगितले.
पुण्यात दोन वॉर्डचा प्रभाग असावा
राज्यातील महानगरबापालिकेच्या निवडणूका येऊ घातल्या आहे, या संदर्भात वॉर्ड रचणे बद्दल पवार यांना विचारले असता ते म्हणाले, मुबई महापालिकेत एक वॉर्ड पद्धत आहे. तर पुणे शहरात चार वॉर्ड पद्धत आहे. युती सरकारमध्ये त्यांना जे योग्य वाटले त्यानुसार त्यांनी वॉर्ड रचना केली. आता महाविकास आघाडीचे सरकार आहे. आम्हाला जे योग्य वाटेल तो निर्णय घेतला जाईल. पुण्याबाबत विचार केल्यास माझ्या वैयक्तिक मत दोन सदस्यीय वॉर्ड असावा. मात्र या बाबतचा अंतिम निर्णय महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते घेतील असे पवार म्हणाले.