एनसीसीमधील सेकंड गर्ल्स बटालीयनचे प्रमुख कर्नल विनायक चव्हाण हे आज सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त सत्कार समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. नूतन सीओ कर्नल अनिरुद्ध वाले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आल. या वेळी सुभेदार मेजर लक्ष्मण राजले यांचाही सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. या वेळी सिनिअर जीसीआय रिटा खंडागळे, दीपाली धस, कॅप्टन खाशिफा इनामदार, चीफ ऑफिसर आशा धेंडे, सेकंड ऑफिसर संध्या पंचमुख, यशोधिनी कुलकर्णी, अनिता गायगोळे आदी उपस्थित होते.
कर्नल चव्हाण यांनी २५ ऑगस्ट २०१९ मध्ये येथील बटालीयनची धुरा हाती घेतली. सुरुवातील बटालीयन कार्यालयाच्या परिसरातील मातीच्या टेकड्या काढून तेथे हिरवळ तयार करून कार्यालयाचे रुप पालटले. याशिवाय कोविडच्या काळात त्यांनी लसीकरण मोहिमेत नोडल ऑफिसर म्हणून काम केले, त्याअंतर्गत अनेक कॅडेट्सना लसीकरण केंद्रावर बंदोबस्तासाठी नेमणूक करण्यात आली होती. त्या साऱ्या कॅडेट्सची काळजी घेण्यापासून ते त्यांची सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांनी उत्तम काम केले. कॅडेट्च्या घराघरामध्ये वृक्षारोपणाची अनोखी मोहीम त्यांनी यशस्वी पार पाडली. याशिवाय फिट इंडिया, आत्मनिर्भर अभियान, योगादिन, डिजिटल फोरम, ऑनलाईन क्लासेस आदी उपक्रम त्यांनी उत्तम हाताळले.