शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

पुणेकरांचा भरघोस प्रतिसाद

By admin | Published: March 27, 2017 3:14 AM

लोकमत आयोजित पुणे प्रॉपर्टी शोकेस २०१७ ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला

 पुणे : लोकमत आयोजित पुणे प्रॉपर्टी शोकेस २०१७ ला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनाला पुण्यातील विविध भागांतील नागरिकांनी व पुण्याच्या बाहेरील मात्र पुण्यात आपलं घर घेऊ इच्छिणाऱ्या असंख्य नागरिकांनी आवर्जून हजेरी लावली. प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने व रविवार असल्याने अनेकांची पावले या प्रदर्शनाकडे वळली. पुण्यासारख्या शांत, सुसंस्कृत व सुरक्षित शहरात आपले घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. या इच्छेला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न ‘लोकमत’तर्फे या प्रदर्शनाच्या माध्यमातून करण्यात आला. या प्रदर्शनात अनेक नामांकित गृहप्रकल्पांचे स्टॉल होते. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व जिल्ह्यातील १ बीएचकेपासून ते बंगलो प्लॉट्सपर्यंतचे विविध पर्याय, तसेच विविध गृहप्रकल्पांचे साइट्स नागरिकांना या प्रदर्शनाच्यानिमित्ताने एकाच छताखाली पाहता आले. ज्येष्ठ नागरिकांपासून ते पुण्याला नवी ओळख देणाऱ्या आयटीक्षेत्रातील अनेक नागरिकांनी आपल्याला हवे असलेले, आपल्या मनासारखे व सर्वात महत्त्वाचे आपल्या बजेटमधील घर पाहायला मिळेल, या उद्देशाने या प्रदर्शनाला हजेरी लावली. (प्रतिनिधी) गुढीपाडव्याच्या निमित्ताने अनेक गृहप्रकल्पांकडून सूट मिळत असल्याने अनेकांनी आपल्या स्वप्नातील घराचे बुकिंगही केले. त्याचबरोबर याच प्रदर्शनात असलेल्या बँक आॅफ महाराष्ट्राच्या स्टॉलवर गृहकर्जाबाबत माहिती देण्यात आली.   प्रदर्शन पाहून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर आपल्याला हव्या असलेल्या आपल्या मनासारख्या घराची माहिती मिळाली याचा आनंद दिसून येत होता.   प्रदर्शनाला भेट दिलेले जावेद इनामदार म्हणाले, लोकमतने हे प्रदर्शन भरवून गृहप्रकल्पांचे अनेक पर्याय एकाच छताखाली आणले आहेत. त्याचबरोबर स्टॉल्सची उत्तम व सुटसुटीत मांडणी केल्याने शांतपणे माहिती घेता आली. हव्या असलेल्या घराची माहिती मिळाली याचा आनंद आहे.