ओसरलेल्या कोरोनाचं पुनरागमन झालंय. या साथीला आता वर्ष पूर्ण होईल. या काळात अनेक नियम, प्रतिबंधांना सामान्य माणूस सामोरा गेला. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' असे सांगून त्याच्यावर सगळी जबाबदारी टाकली गेली अन् आता 'मी जबाबदार' असे त्याला बजावले जात आहे, त्यानिमित्त...
धरुनि वेठीस समाज सारामंत्री घडविती स्व सत्कारकोरोना करतो पुनरागमनत्याला मात्र, मी जबाबदार! - १
गुंड काढती मिरवणुकाअन् मंत्री भरवती दरबार कायदे फक्त माझ्याचसाठीमोडले तर, मी जबाबदार! - २
श्रीमंतांघरी विवाहसोहळेवऱ्हाडींनी भरले घरदारगरिबांना नियमांचा धोंडाकर स्वीकार, मी जबाबदार! - ३
केंद्र म्हणते राज्यच दोषीपेट्रोल गेले शंभरीपारपरस्परांवर कुरघोडीलाही खरे पाहता, मी जबाबदार! - ४
रात्री कोरोनाचा बागुलबुवाबाहेर पडशील तर खबरदार दिवसा फिरलो, कुठेही गेलोतरीही अखेर मी जबाबदार! - ५
नैतिकतेचे गिरवावे धडे तोच अपुला खरा आधारपाप-पुण्याच्या हिशेबालाअसतो, फक्त मी जबाबदार! - ६
सर्रास नियम मोडणारेफिरतात मोकाट, बेदरकारचुकून नियमभंग झाला तरीतू मान्य कर, मी जबाबदार! - ७
ओस शाळा-काॅलेज कट्टेमुकी घंटा, थंड कारभारपाल्याच्या संसर्गालाहीमी पालक, मी जबाबदार! - ८
राज्यकारभारी धाक दाखवीलाॅकडाऊनची टांगती तलवार पुन्हा व्यवहार ठप्प झाल्यासघरी बसण्यास, मी जबाबदार! - ९
माझे कुटुंब, माझी जबाबदारीलहरी नियम, अधांतरी सरकार म्हणे आता, मी जबाबदार! पुन्हा, पुन्हा मीच जबाबदार! - १०
- अभय नरहर जोशी