शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Pro Kabaddi League : प्रो-कबड्डी लीग स्पर्धेत पुणेरी पलटणचा शेवट गोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 19:40 IST

तमिळ थलैवाजवर ४२-३२ अशी मात : गौरव खत्री, अमनचा भक्कम बचाव

पुणे : अखेरच्या पर्वात विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या पुणेरी पलटण संघाने नव्या अकराव्या पर्वातील अपयशाचा शेवट गोड करताना तमिळ थलैवाजवर ४२-३२ असा विजय मिळविला. या विजयाने पुणेरी पलटणची या पर्वातील मोहिम आठव्या क्रमांकाने पूर्ण झाली.

गतविजेते असल्यामुळे अपेक्षा उंचावलेल्या पुणेरी पलटण संघाला या वेळी चमक दाखवता आली नाही. यापूर्वीच आव्हान संपुष्टात आलेल्या पुणेरी पलटणने अखेरच्या सामन्यात मात्र आपल्या पाठिराख्यांना निराश केले नाही. आव्हान संपुष्टात आल्यानंतरही अखेरचा सामना चाहत्यांसाठी खेळण्याचा शब्द त्यांनी खरा केला.लीगमध्ये केवळ दुसऱ्यांदा अंतिम सातमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यावर आर्यवर्धन नवलेने सुपर टेनची कामदगरी केली. व्ही. अजितकुमारनेही ७ गुण मिळवून त्याला सुरेख साथ केली. बचावाच्या आघाडीवर गौरव खत्रीने हाय फाईव्ह करताना आपली छाप पाडली. संकेत चव्हाण आणि अमन यांनी प्रत्येकी चार गुण मिळवून त्यांना सुरेख साथ केली. तमिळ थलैवाजकडून हिमांशू आणि सचिन तंवर या दोघांनाच चमक दाखवता आली. अमिर हुसेन आणि नितेश कुमार यांचा बचावही चांगला राहिला.

सामन्याच्या सुरुवातीपासून वेगवान आणि आक्रमक खेळ करताना पलटण संघाने पूर्वार्धातच दोन लोण चढवत आपली बाजू भक्कम केली. मध्यंतराची २८-१३ गुणांची आघाडी उत्तरार्धात मोठी करत त्यांनी हव्या वाटणाऱ्या विजयाला गवसणी घातली. घरच्या मैदानावर पलटण संघाने मिळविलेला हा दुसराच विजय ठरला. सामना संपल्यावर मैदान सोडताना पुणेरी पलटण संघातील खेळाडूंनी चाहत्यांना हात उंचावून अभिवादन केले आणि अखेरपर्यंत पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले.दिल्ली संघाची दबंगगिरी पुन्हा सिद्धसामन्याच्या ११व्या मिनिटाला चार गुणांनी पिछाडीवर असलेल्या दबंग दिल्लीने गुजरात जाएंट्सला ४५-३१ असे हरविले आणि प्रो कबड्डी लीग मधील प्ले ऑफमध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण विजय नोंदविला. मध्यंतराला दिल्ली संघाकडे तीन गुणांची आघाडी होती.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPro Kabaddi Leagueप्रो कबड्डी लीगKabaddiकबड्डी