संतोष गाजरे
पुणे : हंगेरी येथे २६ ते ३० ऑगस्टदरम्यान होणाऱ्या १८ वर्षांखालील बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धेत (फिबा) कात्रजची कन्या अनया भावसार ही भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
कात्रज येथील राजेश भावसार व वृषाली भावसार यांची मुलगी अनया हिने बास्केटबॉलमध्ये राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर शानदार कामगिरी केली आहे. इंदौर येथे आयोजित ७४व्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पयनशिप स्पर्धेमध्ये तिने दमदार कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सर्वोत्तम क्षमता आणि कुशल नेतृत्व गुणांमुळे अनयाची भारतीय बास्केटबाॅल संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली. युरोपातील हंगेरी देशात होणाऱ्या फिबा विश्वचषक २०२४ स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय संघात तिची निवड झाली. नेतृत्व गुणांमुळे बास्केटबॉल महासंघाने संघाचे नेतृत्वही तिच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्राला मिळवून दिली ६ पदके
आनयाने आतापर्यंत एकुण १३ नॅशनल बास्केटबॉल मॅचेस मध्ये सहभाग घेतले असून महाराष्ट्राला सहा राष्ट्रीय पदके मिळवून देण्यात आनयाचा सिंहाचा वाटा आहे. यात २ गोल्ड १ सिल्व्हर व ३ ब्राँझ पदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आबूधाबी यथे आयोजित बास्केटबाॅल विदाऊट बाॅर्डर कॅम्प मध्ये भारतातून निवड झालेल्या ५ खेळाडूं मध्ये देखील तीचा समावेश होता.आनयाच्या उत्कृष्ट खेळामुळे तीला "स्पोर्ट्स ऑथाॅरिटी ऑफ ईंडीया" कडून तिला "खेलो इंडीयाची " शिष्यवृत्ती मिळत आहे.आनया भावसार हिच्या यशा मध्ये मार्गदर्शक प्रशिक्षक ललित नाहटा यांचा मोठा वाटा आहे.
टॉप प्लेयर म्हणून बनली ओळख
बिषप स्कुल मध्ये आनयाचे प्राथमिक तर एस.पी कॉलेज मध्ये अकरावी झाली बारावी सायन्स मध्ये असताना नॅशनल मेचेस मुळे बारावीला ब्रेक घेतला. तर यावर्षी बारावी परीक्षा ती देणार आहे.सातवी पासून तिला बास्केटची आवड असल्याने व उंची जास्त असल्याने आई वडिलांनी तिला सुरुवातीला खेळ करण्यास सांगितले. स्वतः तीने उत्तम सुरुवात करुन प्रगती करत गेली अंडर १३ मध्ये तिने राज्यासाठी लगेच सिल्वर मेडल मिळवले असून सध्या महाराष्ट्राची सध्याची टॉप प्लेयर म्हणून तिची ओळख आहे. तर इंडिया मधून ३० मधून १२ व १२ मधून तिचे पाहिले नाव आहे अशी तिची कामगिरी आहे.
आई-वडिलांचे प्रोत्साहन
बिषप्स स्कूलमध्ये अनयाचे प्राथमिक तर स.प. महाविद्यालयात अकरावीपर्यंतचे शिक्षण झाले. बारावीत असताना राष्ट्रीय सामन्यांमुळे तिला ब्रेक घ्यावा लागला. यावर्षी ती बारावीची परीक्षा देणार आहे. सातवीपासून तिला बास्केटबाॅलची आवड होती. उंची जास्त असल्याने आई-वडिलांनीही तिला प्रोत्साहन दिले. १३ वर्षांखालील संघाकडून खेळताना तिने महाराष्ट्राला रौप्यपदक जिंकून दिले. सध्या ती महाराष्ट्रातील आघाडीची खेळाडू आहे.