पुणे : खडकवासलाधरणातून रात्री उशिरा हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पुणे जिल्ह्यात गेले दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसानं इंद्रायणी, आरळा नदीला पूर. कालपासून खडकवासला, मुळशी, टेमघर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू केला गेला. त्यामुळे डेक्कन येथील भिडे पूल येथे जलपर्णी अडकल्यामुळे संपूर्ण रस्ता ब्लॉक झाला असल्याचे दिसून आले आहे.
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी पानशेत, खडकवासला, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणात १४ टीएमसी पाणी होते. ते आज शुक्रवारी सकाळी १८ टीएमसी झाले.
खडकवासला धरणात मुठा नदीत झालेल्या विसर्गामुळे परिणामी गेल्या २४ तासात ५ टीएमसीने पाणी साठा वाढला होता. त्यामुळे नदीपात्रातून सगळी जलपर्णी अर्थात भिडे पुलावर आली. ही जलपर्णी बघून पुण्याच्या 'विकासा'चं सध्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
पुणे महापालिकेनं पुणेकरांच्या हितासाठी नवनवीन योजना लॉन्च केल्या आहेत. मात्र यामध्ये आहे त्याकडे महापालिकेचं दुर्लक्ष झाल आहे. दरवर्षी मुसळधार पावसाने भिडे पूल पाण्याखाली जातो, मात्र यावर्षी भिडे पूल जलपर्णीखाली गेला असल्याचं चित्र होतं.