शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

पुण्याच्या सांस्कृतिक बदलाचा दूत ‘ पथिक ’ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:48 PM

पथिक ला या किंवा पथिक मध्ये गेलो होतो हे सांगणे साध्या कार्यकत्यार्पासून ते नेत्यांपर्यंत सगळ्यांना आनंददायी वाटायचे.

राजकीय वास्तूपथिक म्हणजे चालणारा. पुणे शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय वाटचालीत सतत सहयोग देत डेक्कन वरील पथिक हॉटेलने हे नाव सार्थ केले आहे. एक साधे हॉटेल पण ते कसे एखाद्या शहरातील विविध चळवळींचे केंद्र होते याचे हे हॉटेल म्हणजे उत्तम उदाहरण आहे. पथिक ला या किंवा पथिक मध्ये गेलो होतो हे सांगणे साध्या कार्यकत्यार्पासून ते नेत्यांपर्यंत सगळ्यांना आनंददायी वाटायचे.-----------------------------पुण्याच्या गणेशोत्सवाचा चेहराच काँग्रेसच्या सुरेश कलमाडी यांनी बदलून टाकला. नृत्य, संगीत याप्रकारच्या जाहीर कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी अवघ्या एकदोन वर्षातच उत्सवाचा ह्यफेस्टिवलह्ण कसा केला ते पुणेकरांना कळलेही नाही. या फेस्टिवलचे आॅफिस होते डेक्कन वरच्या ह्यपथिकह्णमध्ये. त्याचे मालक कृष्णकांत कुदळे हे कलमाडी यांचे मित्र. कुदळे स्वत: कलाप्रिय. तसेच राजकारणीही. त्यातूनच त्यांनी हॉटेलची एक बाजू फेस्टिवलचे आॅफिस म्हणून वापरण्यास परवानगी दिली. त्यामुळे पुण्याच्याच नव्हे तर राज्याच्या व देशाच्याही सांस्कृतिक क्षेत्रातील अनेकांचा राबता पथिकमध्ये सुरू झाला. म्हणजे डॉ. सतीश देसाई, मोहन जोशी, अभय छाजेड, आबा बागूल असे पदाधिकारी, कार्यकर्ते असायचेच, पण मोहन वाघांसारखे दर्दी रसिकही पुण्यात आले की पथिक मध्येच उतरायचे गणेशोत्सवाच्या आधी साधारण महिनाभर पथिक मध्ये धांदल उडायची ते थेट फेस्टिवल संपल्यावरच थांबायची.मग सुरू झाली मॅरेथॉन. त्याचेही आॅफिस कम प्रसिद्धी कार्यालय पथिकमध्येच. त्यामुळे क्रिडाक्षेत्रातील अनेकांचे ते विश्रांतीस्थळच झाले. कलमाडी यांच्या उंची उडान ला पंख लावण्याचे काम पथिक करत असे. कुदळे  उर्फ भाऊ यांचा त्यात अर्थातच सक्रिय सहभाग असायचा. संबध मग फक्त उपक्रमापुरतेच रहात नसत. त्यानंतरही ते सुरू रहात. त्यातूनच पुण्याला काही नगरसेवक मिळाले, महापौर मिळाले. वेगवेगळ्या क्षेत्रात लिडरशीप करणारे मिळाले. दरम्यानच्या काळात काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. भाऊ पवार यांच्याबरोबर राहिले. मात्र म्हणून त्यांनी कलमाडी यांच्याबरोबर दुरावा कधीच येऊ दिला नाही. सगळे उपक्रम आहेत तसेच सुरू राहिले. राजकारण वेगळे, सांस्कृतिकीकरण वेगळे हे भाऊंइतके उत्तम कोणालाही समजत नव्हते. त्यामुळेच फेस्टिवल किंवा कलमाडी यांनी सुरू केलेल्या कोणत्याही उपक्रमातील पथिक चा सहभाग कधीच कमी झाला नाही.पुढे छगन भूजबळ यांनी समता परिषद स्थापन केली. या परिषदेचे तर पथिक हे महाराष्ट्रातील केंद्रच झाले. स्वत: भाऊ भूजबळांचे खंदे समर्थक. त्यामुळे परिषदेचे संघटनकरण्याचे कामकाज स्वाभाविकच त्यांच्याकडे आले. राज्यभरातील अनेकांचे पथिकवर त्यानिमित्ताने येणेजाणे सुरू झाले. महात्मा फुले यांचा वाडा व आसपासचा परिसर समता भूमी अशा नावाने परिचित करण्याचा, तिथे राष्ट्रीय स्मारक करण्याच्या निर्णयाच्या प्राथमिक बैठका पथिक मध्येच पार पडल्या. पत्रकार, खेळाडू, कलावंत या क्षेत्रात कार्यरत असणाºया देशभरातील व पुण्यातीलही अनेक लहानमोठ्यांचे पथिक  विश्रांतीस्थळ तर झालेच शिवाय उजार्केंद्रही झाले. पथिक परिवार अशा नावाने एक भले मोठे कुटुंबच तयार झाले. आज भाऊ नाहीत. नुकतेच त्यांचे निधन झाले. पथिकसमोरून गेले किंवा पथिकमध्ये गेले तरी त्यांचे स्मरण होतेच. (शब्दांकन - राजू इनामदार)

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणhotelहॉटेल