इंदापूरमध्ये शुक्रवार (दि. १६) सायं ४ ते ६ पर्यंत नीलकंठ हॉस्पिटल ,राजेवलीनगर चौक, इंदापूर तर बारामती येथे शुक्रवारी (ता. १६) सकाळी ८ ते दुपारी.१ पर्यंत मेहता हॉस्पिटल , वीरशैव मंगल कार्यालयाशेजारी, बारामती रुग्णांची तपासणी करणार आहेत. सांधेदुखीवर वेळेवर उपचार व्हावेत, यासाठी पुण्याच्या लोकमान्य रूग्णालयाच्या वतीने अस्थिरोगांच्या आजारासाठी बारामती, इंदापूर,येथील रूग्णांकरिता सांधेदुखीची समस्या सोडविण्यासाठी सुपर स्पेशालिटी आर्थो ओपीडी सुरू केली आहे. काही रुग्णांमध्ये गुडघ्यांची झीज अधिक असते, अशा वेळी सांधेरोपण शस्त्रक्रिया करणे हा एकमेव पर्याय आहे. आजकाल या शस्त्रक्रिया रोबोटिकच्या साहाय्याने केल्या जातात. रोबोटिकच्या साहाय्याने शस्त्रक्रिया केल्याने सर्जरीत अचूकता येते. रुग्णास त्वरित आराम मिळून दुसऱ्याच दिवशी चालण्यास मदतही होते. डॉ. नीलेश कुलकर्णी हे सिनिअर अस्थिरोगतज्ज्ञ असून त्यांनी आजपर्यंत २००० हुन अधिक सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत.ते स्वतः या रुग्णांची तपासणी करणार आहेत. नावनोंदणीसाठी ईश्वर, उमेश यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. (वा. प्र.)
पुण्याच्या लोकमान्य सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची सेवा इंदापूर व बारामतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:09 AM