पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्यात सहभागी होण्याबरोबरच पुण्यात आयोजित विविध कार्यक्रमांना उपस्थितीसाठी अनेक मंत्री गुरूवारी पुण्यात दाखल झाले. पुण्याच्या सर्व भागांत कार्यक्रम असल्याने पुणे अक्षरश: ‘मंत्री’मय झाले होते. पंतप्रधान शनिवारी बारामती येथे येणार असल्यामुळे आज रात्रीच अनेक मंत्री पुण्यात मुक्कामी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आज तीन कार्यक्रम व एक बैठक घेतली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दोन कार्यक्रम आणि एका बैठकीत उपस्थिती लावली. महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनीही दिवसभर पुण्यात बैठका घेतल्या. सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांचाही कार्यक्रम होता. आदिवासी विकास मंत्री विष्णु सावराही बैठकीनिमित्त पुण्यात होते. तसेच केंद्रीय कौशल्यविकास मंत्री राजीव प्रताप रूडीही तसेच मनोज सिन्हा व राधा मोहन सिंग हे केंद्रीय मंत्रीही कार्यक्रमांनिमित्त आज पुण्यात होते. केंद्रीय वन आणि पर्यावरण राज्य मंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीष बापट, जलसंपदा राज्य मंत्री विजय शिवतारे, समाजकल्याण राज्य मंत्री दिलीप कांबळे हे तर पुण्याचेच असल्याने त्यांचेही विविध कार्यक्रम होते. मंत्र्यांच्या मांदियाळीत राज्य सी. व्ही. राव यांचाही दौर होता. शिवसेनेचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.
पुणे ‘मंत्री’मय
By admin | Published: February 14, 2015 3:08 AM