पुणे : पक्षाच्या नेत्यांनी पुण्याच्या पदाधिका-यांवर जास्त विश्वास ठेवल्याने आज शिवसेनेची ही स्थिती झाली आहे. या पदाधिका-यांचे अतिलाड झाले आहेत. येत्या काही दिवसांत शहराला नवा चेहरा मिळेल, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पदाधिका-यांना कानपिचक्या दिल्या.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पुणे विभागाची जबाबदारी संजय राऊत यांच्याकडे दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांशी राऊत यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय थेट चर्चा केली. मंगळवारी पुण्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत त्यांनी संवाद साधला. यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते मंगळवारी बोलत होते. शिवसेना शहरप्रमुख विनायक निम्हण आणि आमदार नीलम गोºहे यांच्या अनुपस्थितीबाबत राऊत म्हणाले, ‘‘निम्हण हे परवानगी घेऊन बाहेरगावी आहेत.’’ नीलम गोºहे यांच्या विषयावर बोलणे मात्र त्यांनी टाळले. आगामी काळात पुणे जिल्ह्यात शिवसेना पक्ष केवळ कागदावर दिसणार नाही, असेही त्यांनी सांगितले.लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र होण्याची शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली. यावर राऊत म्हणाले, ‘‘पवार हे होकायंत्र आहे. राजकारणातील हवा, पाणी, वातावरणातील बदल त्यांना लवकर कळतात.’’ ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय गुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. राज्यात प्रचंड असंतोषाचे वातावरण आहे, परंतु राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून सत्तेमध्ये आहोत. भ्रष्टाचारी काँगे्रस-राष्ट्रवादी काँगे्रसच्या हातात पुन्हा सत्ता जाऊ नये ही शिवसेनेची भूमिका आहे. विरोधक म्हणूनदेखील काँगे्रस-राष्ट्रवादी कमी पडले. यामुळे लोकांच्या मनातील असंतोष बाहेर काढण्याचे काम शिवसेना करत आहे, असे त्यांनी सांगितले.भाजपाकडून निवडणुकांच्या वातावरणामुळे थापादेशात आणि राज्यातील सध्याचे वातावरण निवडणुका लवकरच होतील असेच आहे. परंतु त्या नक्की कधी होणार हे केवळ नरेंद्र मोदीच सांगू शकतील. सत्ताधारी भाजपला त्याची जाणीव झाल्यानेच अधिक थापा मारत आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुका कधीही लागल्या तरी शिवसेना निवडणुकांसाठी तयार असल्याचे राऊत म्हणाले.बुलेट ट्रेन केवळ शिवसेना उखडू शकते!शिवसेना बुलेट ट्रेनच्या प्रश्नावर कमी पडली का, यावर राऊत म्हणाले, पहिल्यांदा विरोध करणारे आम्ही होतो. आमचा मुद्दा हायजॅक करणारा अजून जन्माला यायचा आहे. बुलेट ट्रेन वीट नसते तर रूळ असतो. ते उखडण्याचे काम केवळ शिवसेनाच करू शकते. मंत्रिमंडळ विस्ताराचे आतापर्यंत १९ मुहूर्त आले; पण अद्याप तो झाला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाच त्याबाबत माहिती असू शकते. नारायण राणे यांच्या नवीन पक्षाबाबत बोलण्याचे मात्र राऊत यांनी टाळले.
पुण्यातील पदाधिका-यांचे अतिलाड झाले - संजय राऊत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2017 6:49 AM