पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील वाचनप्रेमी तरुण विविध विषयांवरील अडीच हजार पुस्तके माेफत वाटणार अाहेत. गांधीजींच्या जयंती पासून पुढील सप्ताहात ही पुस्तके पुण्यासह राज्यातील विविध भागात वाटण्यात येणार अाहेत.
महात्मा गांधी यांच्या जयंतीचे अाैचित्य साधत पुण्यातील वाचनप्रेमी तरुण हर्षल लाेहकरे अाणि त्याच्या मित्रांनी हा उपक्रम हाती घेतला अाहे. त्यांच्या एक लक्ष माेफत पुस्तकांचे वाटप या उपक्रमांतर्गत विविध विषयांवरील पुस्तके माेफत वाटण्यात येणार अाहेत. हर्षल व त्याचे मित्र विविध महापुरुषांच्या तसेच त्यांच्या मित्रांच्या वाढदिवसाच्या दिवशी वायफट खर्च न करता त्या पैशातून नागरिकांना विविध सामाजिक विषयांवरील पुस्तकांचे माेफत वाटप करीत असतात. या उपक्रमांतर्गत एक लाख माेफत पुस्तके वाटण्याचा त्यांचा मानस अाहे. महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त गांधी समजून घेताना या पुस्तकाच्या १००० प्रतींबराेबरच इतर विषयांवरील पुस्तकांचे माेफत वाटप करण्यात येणार अाहे. पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील अनेक भागात हा उपक्रम राबविण्यात येणार अाहे.
याबाबत बाेलताना हर्षल म्हणाला, महापुरुषांच्या तसेच अामचे मित्र, अादर्श यांच्या वाढदिवसांच्या दिवशी अाम्ही सामाजिक विषयांवरील पुस्तकांचे माेफत वाटप करीत असताे. जास्तीत जास्त नागरिकांनी सामाजिक पुस्तके वाचावीत हा यामागील हेतू अाहे. एक लक्ष पुस्तके वाटण्याचा अामचा मानस असून महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त अाम्ही गांधी सप्ताह साजरा करणार अाहाेत. या सप्ताहात राज्यातील विविध भागांमध्ये अडीच हजार माेफत पुस्तके वाटण्यात येणार अाहेत.