शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

गुंठेवारीचे दस्त करणारे पुण्यातील दुय्यम निबंधक निलंबित; गुंठाबंदीच्या आदेशानंतर राज्यातील पहिलीच कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 8:15 PM

शासनाच्या आदेशानंतरही दुय्यम निबंधकांची मनमानी कारभार सुरू असल्याने मोठा दणका..

पुणे : शासनाने कायद्याने बंदी घातल्यानंतर व गुंठेवारीची दस्त नोंदणी केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देऊनही राज्यात प्रामुख्याने मोठ्या शहरामध्ये आजही सर्रास बेकायदेशीरपण गुंठेवारीची दस्त नोंदणी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी गुंठेवारीचे दस्त करणारे पुण्यातील भोसरी येथील दुय्यम निबंधक निलंबित केले. शासनाच्या आदेशानंतर राज्यातील ही पहिलीच कारवाई ठरली आहे. 

शासनाने राज्यात तुकडेबंदी कायदा लागू केल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे गुंठेवारी सुरूच आहे. गेल्या काही वर्षामध्ये जमिनीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमिनीचे तुकडे करून त्यांची विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. महसूल अधिनियमातील तरतुदीनुसार तुकडेबंदी लागू आहे. तरीदेखील असे व्यवहार होत असून त्यांची दस्त नोंदणीही होत आहे. मध्यंतरी राज्य सरकारने या संदर्भात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला चौकशीचे आदेश दिले होते. यात असे अनेक प्रकार झाल्याचे निदशर्नास आले होते. यास्तव दुय्यम निबंधक यांना दस्त नोंदणी करतांना दर नमुद केलेल्या महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रिकरण करण्याबाबत (सुधारणा) अधिनियम, २०१५ कलम ८ब मधील परंतुक मध्ये नमुद केल्याप्रमाणे मंजूर केलेला पोटविभाग किंवा रेखांकन दस्तासोबत न जोडता दस्त नोंदणीस स्विकारता येणार नाही. असे असताना हवेली तालुक्यातील भोसरी येथील सह दुय्यम निबंधक यांनी बेकायदेशीरपणे गंठेवारीचे शेकडो दस्तांची बेकायदेशीर नोंदी केल्याचे तपासणीत समोर आल्याने हर्डीकर यांनी एल.ए. भोसले यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई केली. ---- बंदी असताना गुंठेवारीची 635 दस्तांची नोंदणी शेतजमीनीच्या हस्तांतरणाचे दस्तऐवज नोंदवीताना मुंबई तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे आणि त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम 1947 चे नियम 3 नुसार घोषीत केलेल्या स्थानीक क्षेत्रातील कोणत्याही जमीनीचे हस्तांतरण किवा विभागणी, तुकडा निर्माण होईल अशारितीने करता येणार नाही, असे बंधन या कायदयाचे कलम 8 अन्वये आहे. उक्त अधिनियमान्वये प्रत्येक जिल्हया करीता प्रमाणभूत क्षेत्र ठरवून देण्यात आलेले आहे. अशा प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचे/तुकडयाचे हस्तांतरणाचे दस्त नोंदविताना महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 चे नियम क (आय) अन्वये सक्षम प्राधिका-याची पूर्व परवानगी अथवा ना-हरकत प्रमाणपत्र घेतल्याखेरीज अश दस्तांची नोंदणी करु नये अशी तरतूद आहे. तसेच याबाबत या कार्यालयाचे 

रोजीचे परिपत्रका निर्गमित केले असताना देखील श्री भोसले यांनी परिशिष्ठ व मध्ये नमुद एकूण 635 दस्तऐवजांची नोंदणी केली असल्याचे तपासणी दरम्यान निदर्शनास आले आहे.  या शिवाय एल.ए. भोसले यांनी केलेल्या बेकायदेशीर दस्त नोंदणीमुळे शासनाचा 19 लाख 84 हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीsuspensionनिलंबनState Governmentराज्य सरकार