पुणे : पुण्यातील तापमानात सातत्याने वाढ हाेत अाहे. या हंगामात पहिल्यांदाच सलग चार दिवस पुण्याचा पारा 40 अंशाच्या वर असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पुणेकरांना उन्हाळा अाता असह्य हाेत असून पुणेकर पावसाच्या प्रतिक्षेत अाहेत. यंदाच्या माैसमात पुण्याचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसून अाले. राज्याच्या तापमानाच्या तुलनेत पुण्याचे तापमान कमी असायचे. यंदा मात्र उन्हाळा माेठ्याप्रमाणावर जाणवत असून नागरिकांच्या अंगाची लाहीलाही हाेत अाहे. गुरुवारी पुण्यातील कमाल तापमान 40.8 अंश सेल्सिएस हाेते. तर लाेहगाव येथे तर पारा 42 अंशावर पाेहचला हाेता. गेल्या चार दिवसांपासून पुण्यात पारा 40 अंशावरच असल्याचे पाहायला मिळत अाहे. वाढलेल्या तापमानामुळे पुण्यात चांगलाच उकाडा जाणवत अाहे. त्यातच गुरुवारी पुण्यातील काही भागातील वीज काही काळासाठी गेल्याने नागरिकांच्या त्रासात भरच पडली. वाढत्या तापमानामुळे पुणेकर टाेपी, गाॅगल छत्री यांचा वापर करत असल्याचे दिसून येत अाहे. दुपारी 12 नंतर रस्त्यांवरही वाहतूक कमी हाेत असल्याचे चित्र अाहे. नीटच्या व इतर परीक्षा चालू असल्याने उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल हाेत अाहेत. उन्हाचा कडाका कमी करण्यासाठी नागरिकांची पावले अापाेअाप रसवंती गृह तसेच अाईस्क्रिम पार्लरकडे वळताना दिसत अाहेत. ज्येष्ठ नागरिक संध्याकाळच्यावेळी ऊन कमी झाल्यानंतरच बाहेर पडत अाहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरु करण्यात अालेल्या सायकल याेजनेलाही या उन्हाच्या चटक्यामुळे प्रतिसाद कमी मिळत असल्याचे चित्र अाहे.
पुण्याचा पारा @ 40
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 8:31 PM
गेल्या चार दिवसांपासून पुण्याचा पारा सातत्याने 40 अंशावर असून, वाढलेल्या तापमानामुळे पुणेकरांना उन्हाळा अाता असह्य हाेत अाहे.
ठळक मुद्देगेले चार दिवस पारा 40 अंशावरच