बंडगार्डन : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतर} डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 58 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ससून सर्वोपचार रुग्णालय त्याचबरोबर जुन्या पुणो जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास शनिवारी हजारो आंबेडकरी अनुयायांनी पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर दत्तात्रय धनवकडे, उपमहापौर आबा बागूल, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, पुणो शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत दक्षिण विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, परिमंडल दोनचे पोलीस उपायुक्त डॉ. सुधाकर पठारे, लष्कर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त आत्मचरण शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद उगले, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश निकम, लक्ष्मीताई घोडके, नगरसेवक प्रदिप गायकवाड आदिंनी पुष्पहार अर्पण केला. कलाकार कुमार आहेर यांनी ‘मी महात्मा फुले बोलतोय’, हे एकपात्री नाटय़ तर ‘मी सावित्रीबाई फुले बोलतेय’ हे एकपात्र नाटय़ प्रा. डॉ. वृषाली रणधिर यांनी सादर केले.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणो आणि लांयन्स क्लब ऑफ पुणो गणोश खिंड रोड यांच्या संयुक्त विद्यमाने मातोश्री रमाबाई आंबेडकर रिक्षा स्टॅँड फेज 3, ली मेरिडीयन हॉटेल पुणो येथे मोफत पीयुसीचा रिक्षाचालकांसाठी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष नितीन शिंदे, उद्योजक कन्हैयाशेठ खंडेलवाल, विनोद आगरवाल, शाम खंडेलवाल आदि उपस्थित होते. स्टॅँडचे अध्यक्ष अजय गायकवाड आणि उपाध्यक्ष पप्पू भोर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे उपाध्यक्ष अनिल कांबळे, अविनाश गायकवाड, विनोद सोनवणो, राहुल सोनवणो, अशोक सरोदे, उत्तम ढोणो, राजू गाडीलकर, इम्रान खान, जया दरोडे, नितीन कांबळे, विनोद जोधपुरे, शशि सोनवणो, गोपाळ लांडगे, राहुल कांबळे, ज्ञानेश्र्वर खांडेकर, गोविंद नायकवडे, कुमार सोनवणो, संजय पवळे, अजिज शेख, रमेश जिवणो, रायबा म्हस्के, अनिल वाबळे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
01गेल्या अनेक वर्षापासून महात्मा फुले समग्र साहित्य महाराष्ट्र राज्या साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या माध्यमातून प्रकाशित केले जात होते. आतार्पयत प्रकाशित झालेल्या सहाव्या आवृत्तीचे संपादक सुप्रसिद्ध साहित्यीक होते. नोव्हेंबर 2क्क्6 मध्ये ही आवृत्ती प्रसिद्ध झाली होती. त्यांची किंमत 1क्क् रुपये होती. त्यानंतर मात्र सध्या ही आवृत्ती उपलब्ध नाही किंवा सातवी आवृत्ती काढण्यासाठी महात्मा जोतीबा फुले चरित्र आणि साधने प्रकाशन समितीकडे जबाबदारी आहे. मात्र, ती अद्याप पूर्ण झालेली नाही.
02डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणो असे समग्र वामय शासकीय मुद्रणालयाद्वारे एकूण 2क् खंडांमध्ये प्रकाशित करण्यात
येते. मात्र, यातील बहुतांश खंड या ठिकाणी उपलब्ध नाहीत. उपलब्ध नसलेल्या खंडांमध्ये खंड क्रमांक 1, 5, 6, 7 , 11, 16, 17, 2क् यांचा समावेश आहे. दरम्यान या 2क् खंडांपैकी बहुतांश खंड इंग्रजी भाषेत आहेत.