लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पीएमपी दोन दिवसांत नव्या ‘पुण्यदशम’च्या मिडी गाड्यांच्या चाचणीला सुरुवात करणार आहे. या संदर्भात परवानगीसाठी शुक्रवारी (दि. २१) पीएमपी प्रशासनाने पुणे महापालिकेला पत्र दिले. ई-बसप्रमाणे हीदेखील सात दिवस साडेतीन टन वजनाचे वाळूचे पोते ठेवून धावेल. शहराच्या वेगवेगळ्या मार्गांवर रोज बारा ते तेरा तास ही गाडी धावणार आहे.
अटल योजनेच्या मुख्य मार्गावरच पुण्यदशम गाडी धावेल. पन्नास गाड्या पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. शुक्रवारी यातील एक गाडी पीएमपीच्या स्वारगेट कार्यशाळेत आली. या वेळी पीएमपीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप, व्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे यांच्यासह पीएमपीचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
चौकट
प्रतीक्षा ‘सीआयआरटी’च्या अहवालाची
सोमवारी (१७ मे) नव्या ई-बसची चाचणी झाली. त्याचा अहवाल अद्याप ‘पीएमपी’ला मिळाला नाही. तो अहवाल मिळाल्यानंतरच बसच्या उत्पादनाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे ‘पीएमपी’सह पुणेकरांनादेखील या अहवालची प्रतीक्षा असेल.