सासवड येथील शासकीय लॅबमधील गुरुवार (दि.१) एप्रिल रोजी तपासण्यात आलेल्या २१ गावांतील १६६ संशयित रुग्णांपैकी ८४ रुग्णांनाचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. सासवड शहारामध्ये ४४ व्यक्तींचे अहवाल बाधित आले असून, ग्रामीण भागातील दिवे येथील ८, चांबळी, वाळुंज येथील प्रत्येकी ४, वीर ३, टेकवडी, पिसर्वे, परिंचे, माहूर प्रत्येकी २, नारायणपूर, माळशिरस, हिवरे, दिवे, वनपुरी, झेंडेवाडी, भोसलेवाडी, देवडी, पिसे, नायगाव, जेजुरी, साकुर्डे, भिवरी येथील प्रत्येकी एक रूग्ण असे एकूण ८४ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
जेजुरी येथील शासकीय लॅबमधील तपासण्यात आलेल्या, १० गावातील ८१ संशयित रुग्णांपैकी २७ रुग्णांचे अहवाल बाधित आले आहेत. जेजुरी शहरांमधील कोरोना रुग्णांचा आलेख वाढतच चालला आहे. जेजुरी येथील शासकीय लॅबमधील तपसण्यातील जेजुरी येथील १४, वाल्हे ४, धालेवाडी २, वीर, नीरा, साकुर्डे, खळद, सासवड, बेलसर येथील प्रत्येकी १ रूग्ण. तसेच तालुक्या बाहेरील हडपसर येथील एक रूग्ण असे एकूण २७ व्यक्तींचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.