भुलेश्वर - पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सध्या सुरू असून, ऐन उन्हाळ्यात ओढ्यावरील बंधारे दुथडी भरून वाहत आहेत. ऐन उन्हाळ्यात पावसाळा असल्याचा भास होऊ लागला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या मध्ये आनंदाचे वातावरण आहे.पाणी वाघापूर येथील घाटुळीआई मंदिराजवळील पडल्यानंतर ते दिवे, माळशिरस, राजेवाडी पाईपलाईनद्वारे देण्यात येते. यात पाण्याचे विभाजन करून त्या लाईनवरील शेतकºयांना दिलेजाते. या योजनेवर सध्या कांदा, पालेभाज्या, ऊस, टोमॅटो, दोडका, वांगी, फळझाडे इत्यादी पिके अवलंबून आहेत. सध्या या पिकांना पाणी मिळाल्याने वाया जाणारी पिके वाचवण्यात यश आले आहे़पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात दरवर्षीच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. मात्र, यंदा उन्हाळी हंगामातील कमी दराने पाणी सोडण्यात सुरुवात झाली असून शेतकºयांची मागणी वाढत चालली आहे. गावालगतच्या ओढे, नाले यांना पाणी सोडण्यात आल्याने अनेक गावची पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे.पूर्वी पुरंदर तालुका म्हटले की, दुष्काळी परिस्थिती समोर उभी राहते. पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदार बनवण्यासाठी पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू झाली. व लाभार्थी गावांचा पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटला, हे नक्की.पुरंदर उपसा जलसिंचन योजना तयार करताना दुष्काळी पुरंदर तालुक्यात ठिबक सिंचनने पाणी देऊन पुरंदर तालुक्यातील १४४५०, दौंड तालुक्यातील ३७६०, हवेली तालुक्यातील ८९०, तर बारामती तालुक्यातील ६४९८ असे २५,४९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. ठिबक सिंचनाचा वापर करण्यासाठी डोंगराच्या कडेला पाईप लाईन न करता डोंगराकडील काही भाग सोडून ही लाईन तयार करण्यात आली आहे. राज्य सरकारने उपसा सिंचन योजना वीजबिलामुळे अडचणीत येऊ नये म्हणून उन्हाळी हंगामात सरकार ८१ % वीजबिलाची रक्कम भरणार असून उर्वरित १९% रक्कम लाभार्थी शेतकºयांना भरावी लागणार आहे. उन्हाळी हंगामात पाण्याचा दर कमी असल्याने ही योजना आता बाराही महिने चालणार आहे. यासाठी लाभार्थी गावातील पाणीसंस्था उभ्या राहणे गरजेचे आहे. यांच्या वरती निमंत्रण व नियोजन करण्यासाठी शिखर संस्था उभी करने गरजेचे आहे. तसे न केल्यास पाणी वाटपात अडचणी येणार आहेत.ऐन उन्हाळ्यात पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरू झाल्याने उन्हाळ्यात पाण्याची पातळी वाढली आहे. ओढ्यांनी या योजनेचे पाणी सुटल्याने ओढ्यावरील बंधारे दुथडी भरून वाहत आहे. जणू काही पावसाळाच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. - शरद गायकवाड,शेवंती उत्पादक शेतकरीअधिकारी थेट शेतकºयांच्या बांधावर..पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी सध्या सुरू आहे. उन्हाळ्याचा हंगाम असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची मागणी होत आहे. या योजनेचे सहायक अभियंता श्रेणी १ कामेश पाटील यांच्या आदेशानुसार पहिल्यांदाच या योजनेचे सर्वच अधिकारी थेट शेतकºयांच्या बांधावर जाऊन पाण्याचे नियोजन करत आहे. त्यांच्या अडीअडचणी समजावून सोडवत आहेत यामुळे शेतकरीवर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. यात सहायक अभियंता सुहास सकपाळ, थापत्य अभियांत्रिकी सहायक अविनाश जगताप, औदुंबर महाडीक, कनिष्ट लिपीक त्रिभुवन कदम, पाणी कामगार किरण आंबले, गणेश आंबले हे ऐन उन्हाळ्यात शेतकºयांच्या शेतात भेटी देत आहेत व अडीअडचणी सोडवताहेत़
टंचाईत मिळाला पिकांना आधार, पुरंदर उपसा योजनेचे पाणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 2:46 AM