पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी, नीरा येथील शासकीय लॅबमध्ये ४७३ संशयित रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी १९५ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
सासवड येथील शासकीय लॅबमध्ये २८२ संशयित रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी ९९ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले. सासवड येथील ३८, भिवरी ८, सोनोरी ५, पवारवाडी ४, पिसर्वे, वाळुंज, पिंपळे, हिवरे, काळदरी, उदाचीवाडी, गुरूळी येथील प्रत्येकी ३, माळशिरस, एखतपूर, खळद, टेकवडी, बोपगाव, सुपा येथील प्रत्येकी २, माहूर, वाघापूर, शिवरी, दिवे, मावडी, भिवडी, चांबळी, गराडे, अंबोडी, वीर येथील प्रत्येकी १, तसेच तालुक्याबाहेरील १ असे एकूण ९९ रूग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले आहेत.
जेजुरी येथील शासकीय लॅबमध्ये १८४ संशयित रुग्णांची कोरोना तपासणी करण्यात आली. यापैकी ९४ रुग्णांचे कोरोना अहवाल बाधित आले.