भुलेश्वर ; पुरंदर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या पुरंदर उपसा सिंचन योजना शुक्रवार (दि.१२) पासून सुरू होणार आहे. यामुळे येथील शेती पुन्हा बहरणार आहे. या वर्षी पाणी चोरांवर लक्ष ठेवले जाणार आहे. मात्र, देखभाल दुरूस्तीअभावी वारंवार बंद पडणाऱ्या योजनेची ही समस्या कायमस्वरूपी दूर करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदारचे स्वप्न पूर्ण पुरंदर उपसा जलसिंचन योजनेने केले. आजतागायत या योजनेची पाहिजे त्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आलेली नाही. यामुळे याेजनेतून पाणी सोडल्यावर अनेक ठिकाणी गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होतो. एअरवाॅल, पाइपलाइन अनेक ठिकाणी तुटते. यामुळे ही योजना तातडीने दुरुस्त करण्यासाठी मागणी या योजनेचा लाभार्थी गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र, या मागणीला केराची टोपली दाखवली आहे.
ही योजना सुरू करण्यसाठी या योजनेचे शाखा अभियंता गावागावात जाऊन पाण्याच्या मागण्या घेत आहेत. पाण्याची कमतरता भासू नये म्हणून लाभार्थी गावातील शेतकरी देखील पैसे भरत आहेत. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेने पुरंदर तालुक्यातील १४ हजार ४५०, दौंड तालुक्यातील ३ हजार ७६०, हवेली तालुक्यातील ८९०, तर बारामती तालुक्यातील ६ हजार ४९८ असे २५ हजार ४९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
पुरंदर उपसा जलसिंचन योजना गेल्या वर्षी पाऊस सुरू झाल्याने बंद झाली. यंदा तालुक्यात इतका पाऊस पडला की आजही अनेक गावात पाणी आहे. यामुळे दुष्काळी परिस्थिती यंदा मागील वर्षाच्या मानाने कमी आहे. यामुळे सहाजिकच या योजनेच्या पाण्याला मागणी कमी आहे.
चौकट
सध्या चढावरील अनेक गावांकडून पाण्याची मागणी वाढत चालली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून गेल्या वर्षी सर्वाधिक बंद पडली. यामुळे या वर्षी ही सुरळीत सुरू राहण्यासाठी दुरुस्ती होणे गरजेचे होते. मात्र, तसे झाले नाही. ही योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी दिवे लाईन, राजेवाडी लाईन व माळशिरस लाईन यापैकी कोणत्याही दोन लाईनची पुरेशी मागणी येणे गरजेचे आहे.
चौकट
पाणी चोरांवर राहणार लक्ष
सध्या पुरंदर उपसा योजना सुरू होणार असल्याने पाण्याच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. टोकाकडील गावांना पाणी सुरळीत देण्यासाठी यावर्षी पाणी चोरांवरती विशेष नजर ठेवण्यात येणार आहे. पाणी चाेरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
नीलेश लगड, शाखा अभियंता, पुरंदर उपसा जलसिंचन योजना
फोटो ओळ - पुरंदर उपसा योजनेची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
पुरंदर तालुक्याला बारमाही बागायतदारचे स्वप्न पूर्ण करणा-या पुरंदर उपसा जलसिंचन योजना सुरुवातीला जशी सुरू करण्यात आली ती आजतागायत या योजनेवरती पाहिजे त्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे आज ही योजना सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी गळते. एअरवाॅल, पाईपलाईन तुटते. यामुळे ही योजना तातडीने दुरुस्त करण्यासाठी मागणी या योजनेचा लाभार्थी गावातील शेतक-यांनी केली आहे. मात्र या मागणीला आतापर्यंत फक्त केराची टोपली दाखवली आहे.
पुरंदर तालुक्याला वरदान ठरणारी पुरंदर उपसा जलसिंचन योजना शुक्रवारी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी या योजनेचे शाखा अभियंता गावागावात जाऊन पाण्याच्या मागण्या घेत आहेत. पाण्याची कमतरता भासू नये म्हणुन लाभार्थी गावातील शेतकरी देखील पैसे भरत आहेत. यामुळे मागणी होत असल्याने शुक्रवारपासून ही योजना सुरू होत आहे.
पुरंदर उपसा जलसिंचन योजनेने पुरंदर तालुक्यातील १४४५०,दौंड तालुक्यातील ३७६०, हवेली तालुक्यातील ८९०, तर बारामती तालुक्यातील ६४९८ असे २५४९८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
पुरंदर उपसा जलसिंचन योजना गेल्या वर्षी पाऊस सुरू झाल्याने बंद झाली. यंदा तालुक्यात इतका पाऊस पडला की आजही अनेक गावात पाणी आहे.यामुळे दुष्काळी परिस्थिती यंदा मागील वर्षाच्या मानाने कमी आहे. यामुळे सहाजिकच या योजनेच्या पाण्याला मागणी कमी आहे. मात्र गेली दोन वर्षे लाभार्थी गावातील शेतक-यांनी मागणी केली आहे की पाणी सुरू झाल्यानंतर ही योजना वारंवार बंद पडते. ही योजना अनेक ठिकाणी गळते .टोकाकडील गावाकडे जाणारा पाण्याचा प्रवाह कमी होतो. यामुळे पैसे भरून देखील गावांना पाणी कमी मिळते. यामुळे ग॓ळणा-या पाण्याचा भुर्दंड सर्वसामान्य शेतक-यांना बसतो. यासाठी ही योजना तातडीने दुरुस्त होणे गरजेचे आहे. मात्र ही योजना आजही पाहीजे त्या प्रमाणात सुस्थितीत नाही. ही योजना बंद असताना मात्र सर्वांनीच दुर्लक्ष केले.
सध्या चढावरील अनेक गावांकडून पाण्याची मागणी वाढत चालली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून गेल्या वर्षी सर्वाधीक बंद पडली. यामुळे या वर्षी ही सुरळीत सुरू राहण्यासाठी दुरुस्ती होणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही. ही योजना सुरळीत सुरू राहण्यासाठी दिवे लाईन, राजेवाडी लाईन व माळशिरस लाईन यापैकी कोणत्याही दोन लाईनची पुरेशी मागणी येणे गरजेचे आहे. १) पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे शाखा अभियंता नीलेश लगड म्हणाले कि सध्या पुरंदर उपसा योजना सुरु होणार असल्याने पाण्याच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे.टोकाकडील गावांना पाणी सुरळीत देण्यासाठी यावर्षी पाणी चोरांवरती विषेश नजर ठेवण्यात येणार असुन कडक कारवाई करण्यात येणार आहे.
फोटो ओळ - पुरंदर उपसा योजनेची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे आहे.