शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

पहिले प्रेम विसरताच येईना! आयटी इंजिनिअरनं असं काही केलं की कायद्याच्या कचाट्यात अडकला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 8:01 PM

तक्रारदार तरुणी आणि आरोपी शुभम पुंड हे पूर्वी एकाच ठिकाणी काम करायचे

किरण शिंदे 

पुणे : पहिले प्रेम विसरता येत नाही, पहिल्या प्रेमासाठी माणूस काही पण करू शकतो. असंम्हणतात ना! असाच काहीसा प्रकार पुण्यात घडला. ब्रेकअप झाल्यानंतरही विवाहित प्रेयसीचा पाठलाग सुरूच ठेवला. तरीही ती ऐकत नाही म्हटल्यावर तिच्या नवऱ्यालाच मॉर्फ केलेले अश्लील फोटो पाठवले. यानंतर मात्र तरुणीचा संयम संपला आणि तिने पोलिसात तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी आता या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. शुभम शिवाजी पुंड (वय २५, रा. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे. 25 वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार तरुणी आणि आरोपी शुभम पुंड हे पूर्वी एकाच ठिकाणी काम करायचे. यातून त्यांची ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. मात्र त्यानंतर काही महिन्यातच प्रियकराचे आणखी एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे फिर्यादीला समजले. त्यानंतर तिने त्याच्याशी हळूहळू बोलणे कमी केले. त्याचा मोबाईल नंबर ही ब्लॉक केला. काही दिवसांनी फिर्यादी तरुणीचे एका तरुणासोबत लग्न ठरले आणि त्यांचा विवाह देखील संपन्न झाला. 

मात्र यानंतरही आरोपी शुभम काही शांत बसला नाही. त्याने तिचा पाठलाग सुरूच ठेवला. इतकेच नाही तर आरोपीने फिर्यादीच्या पतीचा मोबाईल नंबर मिळवला आणि फोन केले, धमकीचे मेसेज पाठवले. " तू तिला डिवोर्स दे, घरातून हाकलून दे, नाहीतर मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईन आणि या गोष्टीला तुम्ही दोघे जबाबदार असणार" असे मेसेज पाठवले. यानंतरही तरुणी ऐकत नाही म्हटल्यावर त्याने सोशल मीडियावर फिर्यादीचे अश्लील फोटो आणि मेसेज पसरवले. हडपसर पोलिसांनी याप्रकरणी भादवी 354, 354 क, 354 ड, 504 आणि 506 कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टmarriageलग्नCourtन्यायालय