पुणे : पुण्यातील नाट्यवर्तुळात प्रतिष्ठेच्या असलेल्या पुरुषाेत्तम करंडक स्पर्धेला अाज पासून सुरुवात हाेत अाहे. विविध महाविद्यालयांमधील 51 संघ एकमेकांना टक्कर द्यायला सज्ज झाले अाहेत. यंदा पुरुषाेत्तम करंडक स्पर्धेत अावाज कुणाचा घुमणार याकडे अाता सर्वांचे लक्ष लागले अाहे.
अाज पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट अाॅफ टेक्नाॅलाॅजी च्या काॅल अाॅफ द डे या एकांकिकेने यंदाच्या पुरुषाेत्तम सपर्धेला सुरुवात हाेणार अाहे. प्रत्येक महाविद्यालयाची उत्सुकता शिगेला पाेहचली अाहे. गेल्या दाेन-तीन महिन्यांपासून एकांकिकेच्या तालमींना सुरुवात झाली हाेती. यंदा काहीतरी नवीन करण्याचा अनेकांचा प्रयत्न अाहे. पुरुषाेत्तम स्पर्धेत अभिनयाला अधिक महत्त्व असते. त्यामुळे विद्यार्थी अभिनयावर अधिक मेहनत घेत अाहेत. मागच्यावर्षीच्या चुका यंदा हाेणार नाहीत याकडेही लक्ष देण्यात येत अाहे. अनेक नवीन महाविद्यालये सुद्धा यंदा या स्पर्धेत सहभागी हाेणार अाहेत. त्यामुळे पहिल्याच वर्षी पुरुषाेत्तम अापल्याकडेच अाणण्याचा अनेकांचा प्रयत्न असणार अाहे.
अाज संध्याकाळी पाच वाजता काॅल अाॅफ दे डे ही एकांकिका हाेणार अाहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाची झुरळाख्यान ही एकांकिका सादर हाेईल अाणि अाजच्या दिवसाचा शेवट टिळक अायुर्वेदिक महाविद्यालयाच्या विक्टीम या एकांकिकेने हाेणार अाहे. अाज पासून पुरुषाेत्तम करंडकाची तिसरी घंटा खऱ्या अर्थाने वाजणार अाहे.