शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
5
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
6
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
7
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
8
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
9
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
10
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
11
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
12
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
13
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
14
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
15
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
18
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
19
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
20
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल

Purushottam Karandak: ‘पुरूषोत्तम’ची तिकिट विक्री यंदापासून ऑनलाइन; या तारखेपासून तिकीट विक्री सुरू

By श्रीकिशन काळे | Published: July 11, 2023 3:05 PM

अभिवादन सोहळा रविवारी होणार...

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासकतर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येत असलेल्या पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेसाठीचे अर्ज वाटप दि. १४ व १५ जुलै रोजी करण्यात येणार आहे.स्पर्धेचे अर्ज वाटप सायंकाळी ६ ते ८ या वेळात संस्थेच्या कार्यालयात, १२०५, विवेक अपार्टमेंट, शुक्रवार पेठ, सुभाष नगर, पुणे येथे करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी निवेदनाद्वारे दिली.

स्पर्धा पाहू इच्छिणाऱ्या ज्येष्ठांना तसेच पुणेकरांना स्पर्धेची तिकिटे मिळण्यात अडणची येतात. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना स्पर्धेचा आनंद घेता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन संस्थेने यंदाच्या वर्षीपासून स्पर्धेच्या प्राथमिक फेरीची सिझन तिकिटे ऑनलाईनही विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन तिकिट विकत घेणाऱ्यांसाठी नाट्यगृहातील काही आसने आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. ऑनलाईन तिकिट विक्रीला दि. १४ जुलैपासून सुरुवात होणार आहे.  ‌‘उच्छाद' दीर्घांक रविवारीमहाराष्ट्रीय कलोपासकचे माजी चिटणीस कै. राजाभाऊ नातू यांच्या २९व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी रविवार, दि. १६ जुलै रोजी सायंकाळी ६.३०वाजता भरत नाट्य मंदिरात ‌‘उच्छाद' या दीर्घांकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. सायली फाटक, तन्वी कुलकर्णी, सिद्धेश धुरी, निरंजन पेडणेकर यांच्या यात भूमिका असून दिग्दर्शन अनुपम बर्वे यांचे आहे. अमेय गोसावी यांनी निर्मितीची बाजू सांभाळली आहे.  प्रयोग सर्वांसाठी खुला आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड