पुणे : जिल्ह्यातील ५ मतदारसंघांमध्ये प्रत्येकी ७१ टक्के, तर शहरी मतदारसंघांमध्ये सर्वाधिक ६८ टक्के मतदान कसबा मतदारसंघात झाले आहे. वाढलेल्या मतदानाचा कोणाला धक्का बसणार, यावरून पुणे शहर व जिल्ह्यातील पारडे कोठे झुकले आहे, याचा अंदाज बांधण्यात नागरिक व कार्यकर्ते आज सायंकाळनंतर रंगून गेले होते. गेल्या विधानसभेपेक्षा मतदान ८ टक्के वाढले आहे.लोकसभेच्या निवडणुकीत मतदान वाढल्याने अनेक धक्कादायक निकाल लागतील, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. २००९च्या निवडणुकीत शहर व जिल्ह्यात ५४.४४ टक्के मतदान झाले होते. लोकसभेच्या निवडणुकीत ते वाढून ५७.४२ टक्क्यांपर्यंत गेले. ते आणखी वाढून विधानसभेच्या निवडणुकीत २१ मतदारसंघांची टक्केवारी ६२.५ झाली. कसबा व भोसरी मतदारसंघांत ५९ टक्के, तर कोथरूडमध्ये ५७ तसेच चिंंचवडमध्ये ५५, पिंंपरीत ४६, वडगाव शेरीत ५०, शिवाजीनगरमध्ये ५१ तर हडपसरमध्ये ५२ टक्के मतदान झाले आहे.पर्वती ५४, खडकवासला ५३ अशी टक्केवारी आहे.मावळ, बारामती, जुन्नर, खेड व भोर या मतदारसंघांत प्रत्येकी ७१ टक्के मतदान झाले आहे. पुरंदरमध्ये ७०, आंबेगावमध्ये ६७, शिरूर-हवेलीत ६५ टक्के मतदान झाले आहे. कसबा पेठ त्यातुलनेने संवेदनशील असलेल्या मतदारसंघामध्ये मतदान कमी होईल, असा अंदाज व्यक्त होत होता; मात्र सर्वाधिक मतदान करून कसब्याने अपेक्षाभंग केला. ज्या मतदारसंघांत राजकीयदृष्ट्या गोंधळाची स्थिती होती अशा मतदारसंघांमध्ये टक्केवारी कमी असल्याचे दिसून येते. रिपब्लिकन मतदारांमध्ये हा गोंधळ असल्याचे दिसून येते. यंदा सर्वांत कमी पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये ४२ टक्के मतदान झाले. पिंंपरीमध्ये ४६ टक्के मतदान झाले. अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघात भाजप वगळता अन्य उमेदवार होते. (प्रतिनिधी)
टक्क्याचा कोणाला धक्का?
By admin | Published: October 16, 2014 6:04 AM