महात्मा गांधीजींच्या १५१ व्या जयंतीनिमित्त २३ मार्च २०२१ रोजी निसर्गोपचार आश्रम, उरुळीकांचन येथे निसर्गोपचार महोत्सव आयोजित केला होता. यावेळी डॉ. हेगडे हे वेबीनारच्यामध्ये बोलत होते. निसर्गोपचार महोत्सव दिवसाची सुरूवात दिपप्रज्वलन आणि प्रार्थनेने केली गेली. या अंतर्गत एक दिवसीय वेबिनार आयोजित करण्यात आला होता. निसर्गोपचार व जीवनशैली या विषयावर डॉ. कुशन शाह, गांधी आणि आरोग्य विषयक दृष्टीकोन डॉ. एन.जी. हेगडे, ताण तनाव व्यवस्थापन डॉ. संजीव पाटील (प्रेरक वक्ते मनशक्ती केंद्र लोणावळा) व आरोग्यदायी आहाराविषयी जागरूकता वाढविण्यासाठी, डॉ वंदिता बागुल, (नॅचुरोपॅथी) यांनी मार्गदर्शन केले. डॉ. समृद्धी व्यास यांनी चेअर योगासंदर्भात एक सत्र घेतले. उपस्थितांना हर्बल चहा, नैसर्गिक रस, दुपारचे सात्विक जेवण आणि रोग प्रतिकारा करीता फळे, काढा आणि निसर्गोपचार हे पुस्तक अशा किटचे वाटप करण्यात आले. गांधीजींच्या जीवनावर आणि संदेशावरील माहितीपट तसेच गांधीजींच्या निसर्गोपचारांवरच्या विश्वासावर आधारित प्रदर्शन दाखविण्यात आले. निसर्गोपचार आश्रमचे व्यवस्थापक प्रवीण कुंभार यांनी राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था आणि निसर्गोपचार आश्रमच्या संपूर्ण टीमचे या महत्वाच्या वेबिनारला यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले बद्दल आभार मानले.
गांधीजींच्या स्वावलंबनाचे सूत्र आचरणात आणा : हेगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:11 AM