भोर : हिर्डोशी गावांतर्गत असलेल्या धामणदेव येथील गेनबा गोरे या शेतकऱ्याचा बोकड अजगराने गिळल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. गेल्या महिन्यातही याच ठिकाणी बकरी गिळली होती. त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे. भोरपासून सुमारे ३० किलोमीटरवर महाड-पंढरपूर रोडलगत डोंगराच्या बाजूला धामणदेव गाव आहे. येथील धनगरवस्तीवरील गेनबा गोरे यांची बकरी येथील स्मशानभूमीजवळ चरायला गेली होती. दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अजगराने कळपातील एक बोकड गिळला. गेल्या महिन्यात एक बकरी अजगराने गिळल्यानंतर वनविभागाने त्या अजगराला तेथेच जवळ सोडून दिले होते. आता पुन्हा हीच घटना घडल्याने तोच अजगर असावा, अशी शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे. त्या अजगराला पकडून वनविभागाने सर्पोद्यानमध्ये नेऊन सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून संदीप धामुणसे यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील धामणदेव येथे अजगराने गिळला बोकड; महिन्यातील दुसरी घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 5:24 PM
हिर्डोशी गावांतर्गत असलेल्या धामणदेव येथील गेनबा गोरे या शेतकऱ्याचा बोकड अजगराने गिळल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. गेल्या महिन्यातही याच ठिकाणी बकरी गिळली होती. त्यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे.
ठळक मुद्देदुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अजगराने गिळला कळपातील एक बोकड गेल्या महिन्यात बकरी अजगराने गिळल्यानंतर वनविभागाने अजगराला तेथेच सोडून दिले होते