पुणे - सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यावर यंदाच्या वर्षीपासून निर्बंध लागू केल्यानंतरही यंदाच्या दिवाळीत हवेची गुणवत्ता सुधारण्याऐवजी खालावलेलीच दिसून येत आहे. पुणे शहरात मागील वर्षीच्या दिवाळीत हवेचा गुणवत्ता निर्देशांक ११९ इतका होता, त्यामध्ये यंदाच्या वर्षी दिवाळीच्या दिवसांमध्ये ९ अंकांनी वाढ होऊन तो १२७ इतका झाला आहे.वातावरणातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ० ते ५० पर्यंत आरोग्यास चांगला असतो. परंतु पुणे शहरात वाहनांची वाढती संख्या, धूळ आदींमुळे ६० ते ८० च्या दरम्यान असतो. दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाजविल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे हवेची गुणवत्ता अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये जाते. दिवाळीमध्ये होणाºया या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने विशिष्ट वेळेतच फटाके वाजविण्याचे निर्बंध घालून दिले. यंदाच्या वर्षीपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके उडविण्यास परवानगी देण्यात आली. या निर्बंधानंतर किमान मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधार होण्याची अपेक्षा होती. मात्र ती पूर्णपणे फोल ठरली आहे. सफर संस्थेच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या अहवालातील आकडेवारीनुसार यंदाच्या दिवाळीत हवेचा गुणवत्ता निर्देशांक १२७ इतका राहिला, मागील वर्षी (२०१७) हा १२७ इतका होता, तर २०१६ मध्ये तर १६८ इतका होता. शहरातील कर्वे रस्त्यावरच्या सह्याद्री हॉस्पिटलजवळ दिवाळीच्या काळात हा निर्देशांक १८७ पर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे. तो सातत्याने १०० च्या पुढेच राहिला आहे.फटाके उडविण्याबाबत न्यायालयाने घालून दिलेल्या निर्बंधांचे सर्रास उल्लंघन झाल्याचे चित्र दिवाळीच्या ६ ते ९ नोव्हेंबर या कालावधीमध्ये दिसून आले. विशेषत: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात सर्वत्र खूपच मोठ्या प्रमाणात फटाके उडविण्यात आले. न्यायालयाने महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिवाळीपूर्वी आणि दिवाळीनंतर सुमारे १४ दिवस हवेच्या गुणवत्ता निर्देशांकावर देखरेख करण्यासाठी आदेश दिले आहेत. तसेच विक्री होणाºया फटाक्यांची तपासणीही करण्याचे सांगितले होते. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व कर्मचारी दिवाळीच्या काळातील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकावर सातत्याने लक्ष ठेवून होते. पुणे शहराच्या विविध भागांतून त्याबाबतची आकडेवारी गोळा करण्यात आली आहे. या आकडेवारीचे विश्लेषण करण्यात येत आहे. त्याबाबतचा सविस्तर अहवाल लवकरच महाराष्टÑ प्रदूषणनियंत्रण मंडळाकडून प्रसिद्ध केला जाणार आहे.महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ अहवाल जाहीर करणारन्यायालयाने दिलेल्या निर्देशानुार महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिवाळीच्या काळात पुणे शहराच्या विविध भागांतून हवेच्या गुणवत्ता निर्देशांकांची आकडेवारी व माहिती गोळा केली आहे. या आकडेवारीचे विश्लेषण करण्याचे काम सध्या सुरू असून, त्याबाबतचा सविस्तर अहवाल लवकरच महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रसिद्ध केला जाणार आहे.हवेचा गुणवत्ता निर्देशांक तक्ता० ते ५० : चांगली : आरोग्यावर परिणाम नाही५१ ते १०० : साधारण : आजारी व्यक्तीस श्वसनास त्रास११० ते २०० : धोकादायक : अस्थमा, हृदयरोग असणाºयांना त्रास,फुप्फुस अशक्त असणाºयांवर परिणाम२०१ ते ३०० : वाईट : सर्वसाधारण व्यक्तींनाही श्वसनास त्रास३०१ ते ४०० : खूप वाईट : सर्वांनाच अशक्तपणा४०१ ते ५०० : तीव्र : आरोग्य चांगले असणाºयांवरही तीव्र परिणाम
निर्बंधांनंतरही फटाक्यांचा धूर : दिवाळीतील हवेची गुणवत्ता धोकादायकच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 2:26 AM