निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे श्रीमती बबईताई माध्यमिक आश्रमशाळेत शिकणाऱ्या राज्यातील भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मुला-मुलींसाठी कोंढापुरी येथील ग्लट सिस्टीमस प्रा.लि. या कंपनीच्या सामाजिक दायित्व निधीतून सुमारे २५ लाख रु खर्चाच्या बांधण्यात आलेल्या इमारतींचे उद्घाटन भिडे यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व शिरूरचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे, उपाध्यक्ष ॲड. रावसाहेब करपे, सुदामराव चव्हाण, सचिव कांतिलाल टाकळकर, सहसचिव वसंतराव रणदिवे, संचालक काकासाहेब करपे,कंपनीचे उत्पादन संचालक जयंत सावंत,अभियांत्रिकी संचालक विजय विठ्ठल के, शोनिल बकरे, अमजद बाणेदार, कुमार राठोड, गौरी भिडे, सत्यजित गायकवाड, मिलिंद वर्दे, मुख्याध्यापक दिनकर धुमाळ, प्राचार्य दिलीप पवार, अंजली गायकवाड, लता चव्हाण उपस्थित होते.
सूत्रसंचालन बापू लोंढे यांनी केले. आश्रम शाळेचे मुख्याध्यापक दिनकर धुमाळ यांनी प्रास्ताविक केले, तर मंदा काळे यांनी आभार मानले.
--
चौकट
वसतिगृहात बांधून संस्थेकडे हस्तांतरित
यामध्ये मुलांसाठी २ हजार चौरस फूट हॉल व ६ स्नानगृह, ६ स्वच्छतागृह, तर मुलींसाठी १ हजार ४०० चौरस फूट हॉल ४ स्नानगृह व ४ स्वच्छतागृह, संपूर्ण विद्युतीकरण, रंगरंगोटीसह २ स्वतंत्र इमारती आहेत. .------------------------------फोटो:निमगाव म्हाळुंगी येथे आश्रमशाळा मुला-मुलींच्या वसतिगृह इमारतीचे उद्घाटन करताना मान्यवर.