सांगवी: जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे यांच्या पाठपुराव्यामुळे सांगवी -डोल्रेवाडी जिल्हा परिषद गटात जास्तीचा निधी उपलब्ध होऊन दर्जेदार विकासकामे होऊ लागली आहेत, असे प्रतिपादन बारामती तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी केले.
सांगवी (ता. बारामती ) येथे जिल्हा परिषद फंडातून विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा समारंभ पार पडला. माळवाले वस्ती येथील गणेश मंदिर परिसर पेव्हर ब्लॉक बसवणे,तावरे वस्ती येथील दत्त मंदिर परिसर पेव्हर बसवणे या विविध विकासकामांचा भूमिपूजन समारंभ बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते झाला. यावेळी होळकर बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्या मीनाक्षी तावरे यांच्या प्रयत्नातून सध्या सांगवी व परिसरात विविध विकासकामे सुरू आहेत. गेल्या चार वर्षात जिल्हा परिषद गटात कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून विकासकामांना गती मिळत असल्याने नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. भूमिपूजन समारंभा दरम्यान पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, अबोली भोसले, प्रकाश तावरे, महेश तावरे, किरण तावरे, सरपंच चंद्रकांत तावरे, प्रणव तावरे,अंकुश तावरे ,प्रताप तावरे, रामभाऊ तावरे,हनुमंत तावरे, बापूराव गायकवाड, आशिष तावरे,सचिन पोंदकुले,पोपट रणवरे, श्याम तावरे, संजय तावरे, अरुण लोंढे, सनी तावरे,डी,टी तावरे, अरुण तावरे,प्रकाश झोरे,शिवाजी एजगर, प्रदीप कदम,सुनील मुळीक,दिलीप तावरे, सुधाकर जगताप,मिलिंद देशमुख,राहुल धुमाळ,आदी उपस्थित होते.पोपट रणवरे व आकाश तावरे यांनी स्वागत केले तर अक्षय तावरे यांनी आभार मानले.
सांगवीत विकासकामांचे भूमिपूजन करताना संभाजी होळकर, मीनाक्षी तावरे, अबोली भोसले व इतर
०३०४२०२१-बारामती-१२