पाटेठाण : टाकळी भीमा (ता. दौंड ) येथील भीमा नदीवरील पुलाच्या कामासाठी १५ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली असून, या पुलाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अर्थसंकल्पीय अधिवेशन २०१६ मध्ये आमदार राहुल कुल यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत दौंड व शिरुर तालुक्यातील औद्योगिक वसाहतींना जोडणारा जवळचा रस्ता असल्यामुळे या पुलाला मंजुरी मिळण्याची मागणी केली होती. त्यानंतर काही काळ हे आश्वासन प्रलंबित राहिले. पुन्हा २०१९ मध्ये आमदार झाल्यानंतर आमदार कुल यांनी या कामाचा पाठपुरावा करण्यास सुरवात केली. कामाला निधी देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी दिले होते. परंतु आश्वासनाची पूर्तता झाली नव्हती. त्यानंतर आमदार कुल यांनी विधानसभेच्या विविध समित्यांशी पत्रव्यवहार करुन व बैठका आयोजित करुन सदर कामाची आश्वासनाची पूर्तता करण्याची विनंती केली होती. कामाचा समावेश अर्थसंकल्पात करण्याचे अधिवेशन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पात पुलाच्या कामासाठी सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून तालुक्यातील विकास कामांसाठी यापुढेही प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार कुल यांनी सांगितले. ..........................................................................................