शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गतीशील लोकशाही हा सर्वांत मोठा प्रश्न : गोविंद निहलानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2019 20:24 IST

जसा काळ बदलतो तसे नवनवीन सामाजिक प्रश्न सातत्याने विकसित होत असतात. भारतीय लोकशाही ही स्थिर नव्हे तर ती गतीशील स्वरूपाची  आहे. लोकशाही विकसित होण्याची प्रक्रिया ही निरंतर होत असल्याने काही प्रश्न बदलतात तर काही वगळले जातात

पुणे : जसा काळ बदलतो तसे नवनवीन सामाजिक प्रश्न सातत्याने विकसित होत असतात. भारतीय लोकशाही ही स्थिर नव्हे तर ती गतीशील स्वरूपाची  आहे. लोकशाही विकसित होण्याची प्रक्रिया ही निरंतर होत असल्याने काही प्रश्न बदलतात तर काही वगळले जातात. सध्याच्या काळात आपण लोकशाहीच्या संक्रमणावस्थेतून जात असून, गतीशील लोकशाही हा सर्वांत मोठा प्रश्न आहे, असे सांगत ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी नयनतारा सहगल या मुद्यावर थेट भाष्य करणे टाळले. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील  ‘पिफ फोरम’चे उदघाटन गोविंद निहलानी आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल यांनी निहलानी यांच्याशी संवाद साधला असताना त्यांनी सामाजिक व्यवस्था, असहिष्णुता या मुद्यांवर सावध भूमिका घेतली. कलात्मक लिखाणात लेखकाची स्वत:ची विचारप्रक्रिया फारमहत्त्वाची असते आणि ती कुणीही तुम्हाला शिकवू शकत नाही. तुमच्यातच ती असायला हवी असे ते म्हणाले. निहलानी म्हणाले,  माझा  चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टीकोन विकसित होण्यात ज्येष्ठ नाटककार व लेखक विजय तेंडुलकर यांचा मोठा वाटा आहे. लेखक म्हणून त्यांच्या कामात सखोलता होती. मला तर त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालेच,  भारतीय चित्रपटांसाठी त्यांचे योगदान मोठे आहे. परंतु माझ्या मते त्यांना या माध्यमातून जी जी अपेक्षित ओळख मिळायला हवी होती ती मिळाली  नाही.              ’गांधी’ चित्रपटाच्या अनुभवाविषयी विचारले असता ते म्हणाले,   रिचर्डअटनबरो यांच्या  ‘गांधी’ चित्रपटसाठी   ‘सेकंड युनिट’ दिग्दर्शक म्हणून माझी निवड होईल असे वाटले नव्हते. तोपर्यंत   ‘आक्रोश’ हा माझा एकच चित्रपट प्रदर्शित झाला होता. परंतु त्यांच्या चमूने माझा चित्रपटबारकाईने पाहिला होता.  ‘गांधी’साठी काम करताना व्यवस्थापनाचे उत्तम धडेमला मिळाले. या चित्रपटाची पटकथा चित्रपटाच्या प्रत्येक विद्याथर््याने वाचायला हवी. तीन तासांत महात्मा गांधीचे ८० वर्षांचे आयुष्य बसवणे ही सोपी गोष्ट नाही. चित्रपटामध्ये तंत्रज्ञानाच्या वापराबाबत त्यांनी सकारात्मक चित्र मांडले. आता सर्व गोष्टी ‘डिजिटल’ झाल्या आहेत, परंतु बदलते तंत्रज्ञान हे काम अधिकाधिक चांगले व्हावे यासाठीच असते. त्यामुळे आपण ते कायम स्वीकारायला हवे. सुरूवातीला आम्ही  ‘सेल्युलॉईड’ माध्यमात चित्रपट बनवत असू आणि त्या माध्यमात बनलेला चित्रपट  पाहणे हा एक निराळा आणि सुंदर अनुभव होता. तंत्रज्ञान नेहमीच आपल्याला   ‘क्रिएट आॅर पेरिश’ असे आव्हान देत असते. परंतु आताचे नवीन तंत्रज्ञान उत्तम असून प्रतिमानिर्मितीचे नवे आयाम त्यामुळे खुले झाले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :PIFFपीफFilmfare Awardफिल्मफेअर अवॉर्डGovind nihlaniगोविंद निहलानी