शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Published: June 26, 2017 3:32 AM

जुन्नर तालुक्यातील कांदळी व वडगाव कांदळी या ठिकाणी तीन आठवड्यात तीन शेतकऱ्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळवंडी : जुन्नर तालुक्यातील कांदळी व वडगाव कांदळी या ठिकाणी तीन आठवड्यात तीन शेतकऱ्यांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.जुन्नर तालुक्यात पाच धरणे असल्यामुळे हा तालुका बागायती क्षेत्र असलेला तालुका म्हणून ओळखला जातो. या धरणांमधून कालवा व तालुक्यात कुकडी, मीना, मांडवी या नद्यांमधून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. या नद्यांवर अनेक शेतकऱ्यांनी विद्युत पंप बसवून पाणीपुरवठा योजना राबविल्या आहेत. या योजना राबवत असताना शेतकऱ्यांनी पाण्यावर तरफेचा वापर करून पाण्यावर तरंगत्या मोटारी बसविल्या आहेत. जसजसे नदीमधील पाणी कमी कमी होत जाते, तशा मोटारी आपोआप नदीकडेला येत असतात. अशा वेळी शेतकरी ती मोटार पुढे जाण्यासाठी व मोटारच्या फुटवॉलमधील अडकलेला कचरा काढण्यासाठी नदीप्रवाहाच्या पाण्यात उतरतात. अशा वेळी विजेचा शॉक लागून त्यांचा अपघात होतो. अशा घटना गेल्या पाच वर्षांत तीन वेळा घडल्या आहेत. त्यामध्ये कांदळी व वडगाव कांदळी येथील पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाला आहे. गेल्या तीन आठवड्यातच तीन शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याने शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नदीच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडी व एकांतपणा असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या मोटारी व केबल चोरीला जात आहेत. याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही त्याचा तपास लागत नसल्यामुळे शेतकरी स्वस्तामधील आणि हलका दर्जा असलेल्या केबल वापरत आहेत. या हलक्या दर्जाच्या केबल वापरल्याने या केबल लवकर खराब होतात व त्यामधील वायर उघडी पडून त्याचा शॉक मोटारीच्या लोखंडी साडग्याला लागून अपघात होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वारंवार घडणाऱ्या या अपघातांवर आता कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे, हे मात्र निश्चित.