राजगुरुनगर : खेड तालुक्यात जागेअभावी रखडलेल्या घरकुलांसाठी शासनाने गायरान जागा देण्याचा निर्णय घेतल्याने बेघर घरकुलांचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. शासकीय गायरानावर सन २०११ पूर्वी अनधिकृत बांधण्यात आलेल्या घरांबाबत ग्रामसेवकांना आणि तलाठ्यांना सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
खेड तालुक्यातील घरकुलासंदर्भात येथील प्रांत कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, नायब तहसीलदार लतादेवी वाजे, मंडल अधिकारी डी. यू. उगले, एस. बी. तुर्रे, पंचायत विस्तार अधिकारी एस. एस. साळुंखे, एस. डी. थोरात, व्ही. एस. माकर आदी उपस्थित होते. खेड तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना शासनाने घरकुल मंजूर केले असताना, केवळ जागा उपलब्ध नसल्यामुळे ही कामे होत नव्हती. ही कुचंबणा टाळण्यासाठी महसूल विभागाने गायरान जागा देण्याचा निर्णय घेतल्याने खेड तालुक्यात २० गावांमध्ये जवळपास ३५ -४० घरकुल उभारणीचा प्रश्न मार्गी लागणार आहे.यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी ८३ घरकुलासाठी तीन गावांच्या शासकीय गायरान जागेवर घरकुले उभारणीस मंजुरी दिल्याची माहिती गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार यांनी दिली.खेड तालुक्यात जागेअभावी मंजूर लाभार्थ्यांना घरकुले उभारणीचा प्रश्न बिकट झाला होता. आयुष प्रसाद यांनी पुढाकार घेऊन शासकीय गायरानातील जागा उपलब्धतेसाठी पुढाकार घेतल्याने रासे, पाळू, कडधे या तीन गावांत मिळून ८३ घरकुलांचा जागेचा प्रश्न जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने निकाली निघाला होता. जिल्ह्यात खेड तालुक्याने गायरान जागा मिळवण्यात आघाडी घेतली.तालुक्यातील इतर गावातील घरकुल लाभार्थ्यांसाठी गायरान जागा उपलब्ध व्हावी म्हणून खेड पंचायत समितीच्या सभागृहात ४१ गावांच्या तलाठी आणि ग्रामसेवक यांची बैठक घेऊन गायरान जागेचा आढावा घेतला असता जवळपास २० गावांमध्ये शासकीय जागा उपलब्ध होणार आहे. यासाठी आमदार सुरेश गोरे, सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती भगवान पोखरकर यांनी पाठपुरावा करुन मागणी केली४खेड तालुक्यात २०११ च्या सर्वेक्षणात कमी उत्पन्न गटातील १५३८ लाभार्थी घरकुल योजनेत पात्र ठरले. आॅगस्ट २०१६ च्या लाभार्थी सर्वेक्षणात १५३८ पैकी ११९० लाभार्थी पात्र ठरले. उर्वरित ३४८ लाभार्थी स्थलांतर, मयत, पक्के घर, वारस नाही आदी कारणांमुळे रद्द झाले.११९० पात्र लाभार्थ्यांपेकी ...आॅनलाइन नोंदी करण्यात आल्याने दोन वर्षांत ७५१ लाभार्थ्यांना घरकुले मिळाली. उर्वरित ४३९ जणांना लाभ देणे बाकी असून २४७ जणांकडे जागा उपलब्ध आहे.गायरान जागेच्या उपलब्धतेनुसार तालुक्यातील १९२ लाभार्थ्यांपेकी ...जवळपास १२५ घरकुलांना जागा उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. लाभार्थ्यांना अर्धा गुंठा जागा ( ५०० स्क्वेअर फूट ) दिली जाणार आहे.१९२ लाभार्थ्यांकडे जागा उपलब्ध नव्हती. मात्र आयुष प्रसाद यांनी गायरान जागा उपलब्ध करण्याचे आदेश दिल्याने त्यांची समस्या सुअली आहे. २० गावांतील ३५-४० जणांना गायरान जागा उपलब्ध असल्याने त्वरित लाभ होईल.२०११ पूर्वीची शासकीय गायरान जागेवर अनधिकृत बांधलेली घरे अधिकृत केली जाणार असली, तरी ज्यांना अन्यत्र कोठे घरे नसेल (बेघर) अशांनाच पात्र ठरवले जाणार आहे.