पुणे - लोहगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या २५ एकर जागेचे हस्तांतर करण्यास राज्य शासनाने तत्त्वत: मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे पुणे महापालिका आयुक्तांनी संबंधित विभागांची बैठक घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. त्यामुळे लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पुण्यात लष्कराचे दक्षिण मुख्यालय असून लोहगाव विमानतळ हवाईदलाच्या ताब्यात आहे. लोहगाव विमानतळावरून होणारी उड्डाणे आणि विमाने उतरण्याºया विमानांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे विमातळ विस्तारीकरणासाठी जागेची आवश्यकता आहे. तसेच, विमानतळ परिसरात अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे. विमानतळाचे आधुनिकीकरण आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने हवाईदलाकडे विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जागा मागितली आहे. या पार्श्वभूमीवर, लोहगाव विमानतळ विस्तारीकरणासाठी राज्य शासनाने २५ एकर जागा हस्तांतरित करावी, असे आदेश केंद्र्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विमानतळ पायाभूत समितीच्या दिल्लीतील झालेल्या बैठकीत दिले होते. त्यानंतरनितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाली असून, राज्य शासनाने ही जागा देण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे, अशी माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी सोमवारी दिली.शिरोळे म्हणाले, ‘‘दिल्ली येथे अधिवेशनानिमित्त गडकरी यांच्याशी लोहगाव विमानतळाबाबत चर्चा झाली. त्या वेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद झाला असून पालिका आयुक्त कुणाल कुमार यांना पुढील कार्यवाहीसाठी बैठक घेण्याच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले.
लोहगाव विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 4:19 AM