भोर तालुक्यातील तीर्थक्षेत्र मांढरदेवी परिसरातील डोंगरातील वन्यप्राणी चारापाण्यावाचून वंचित राहात आहेत ही बाब लक्षात येताच पूर्व हवेेेलीतील आळंदी म्हातोबाची येथील सचिन माथेफोड व कुंजीरवाडी गावातील प्रमोद सावंत यांनी परिसरातील एव्हरेस्ट स्पन पाईपचे अधिकारी अविनाश जगताप यांच्याशी संपर्क साधला व डोंगर परिसरात वन्यप्राण्यांचसाठी पाणवठा तयार करण्याचे ठरविले.
अविनाश जगताप यांनी त्वरित विनामोबदला सिमेंटची टाकी तयार करून दिली. यावेळी वनविभागाचे अधिकारी विशाल अडागळे, अशोक चव्हाण व म्हस्के यांनी शासकीय नियमाच्या परवानग्यांची तातडीने परवानगी दिली. या कामासाठी स्थानिक तरुण हरीश गोठे, विशाल वायकर, सुमित चव्हाण, राज मदने, विजय रणदिवे यांनी मोलाचे सहकार्य मिळाले.
--
२९लोणीकाळभोर अन्न पाण्याची व्यवस्था
लोणीकाळभोर येथी पक्ष्यांस्ाठी अन्नपाणी व घरट्यांची व्यवस्था करताना तरुण
.