अमावस्येच्या निमित्ताने पहाटे चार वाजता श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींची महापूजा करून मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी सहा वाजता मंदिरासमोरील दगडी कासवासमोर देवाच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. सकाळी आठ वाजता देवस्थान ट्रस्ट व भाविकांच्या वतीने अभिषेक करण्यात आले. सकाळी दहा वाजता उत्सव मूर्तींसमोर भाविकांच्या दहीभात पूजा बांधण्यात आल्या. दुपारी बारा वाजता धुपारती करून मंदिराचा मुख्य गाभारा बंद करण्यात आला. दुपारी सव्वाएक वाजता मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले.
अमावस्यानिमित्त देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांसाठी पिण्याचे पाणी, दर्शन बारी, तीन ठिकाणी वाहनतळ व्यवस्था, परिसर स्वच्छता, स्वयंसेवक आधी सुविधा पुरविण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टचे सचिव सय्यद मुलाणी यांनी सांगितले. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष रवींद्र धुमाळ, हनुमंत धुमाळ, अमोल धुमाळ, अभिजीत धुमाळ, राजेंद्र कुरपड, संजय कापरे, शिवाजी कदम, नामदेव जाधव आदी विश्वस्त मंडळी उपस्थित होते. अमावस्या उत्सवानिमित्त सासवड पोलीस स्टेशनच्या वतीने ट्राफिक पोलीस, होमगार्ड, पोलीस मित्र यांच्या माध्यमातून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
१३परिंचे
श्री क्षेत्र वीर (ता.पुरंदर) येथे अमावस्येनिमित्त भाविकांची गर्दी.