श्रीक्षेत्र ओझर येथील श्री विघ्नहर गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पहाटे ५.०० वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शाकुजी कवडे, खजिनदार किसन मांडे, विश्वस्त देविदास कवडे, प्रकाश मांडे, साहेबराव मांडे, ज्ञानेश्वर कवडे, शंकर कवडे, अनिल मांडे, बबन मांडे, ग्रामस्थ अविनाश जाधव यांनी अभिषेक करून मंदिर दर्शनासाठी खुले केले. पहाटे पाच ते रात्री अकरापर्यंत रांगेत भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. सकाळी ७.०० वाजता व दुपारी १२.०० वाजता मध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी ८.०० वाजता नियमित पोथी वाचन करण्यात आले. सकाळी १०.३० वाजता ‘श्रीं’ना नैवेद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप करण्यात करण्यात आली. येणाऱ्या भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग, शुद्ध पिण्याचे पाणी, खिचडी वाटप, अभिषेक व्यवस्था, देणगी कक्ष, पार्किंग, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्यात आली.
सायंकाळी ७.०० वाजता नियमित हरिपाठ करण्यात आला. चंद्रोदयापर्यंत हभप माऊलीमहाराज दुराफे, कुसूर यांचे कीर्तन झाले. त्यांना साथसंगत रामप्रसादिक भजन मंडळ, शिरोली खु. यांनी दिली. भालचंद्र विनायक रवळे यांनी भाविकांसाठी अन्नदान केले. पहाटे ५ ते रात्री ११ पर्यंत एक लाख भाविकांनी दर्शन घेतले. रात्री १०.३० वाजता शेजआरती करून ११.०० वाजता मंदिर बंद करण्यात आले.महाप्रसाद व देवस्थानच्या विकासकामांसाठी देणगी देणारे आनंद मयेकर (मुंबई), मोहर व ऋग्वेद प्रकाश पाटील (वसई), आमदार लक्ष्मण जगताप, अनिकेत भागवत (अमरावती), उद्योजक विजय जगताप, उद्योजक दत्ता अभंग (संगमनेर), प्रकाश काटे व पूजा महेशदादा लांडगे, सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अजित देशमुख यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ, अध्यक्ष व कर्मचारी वर्ग व ओतूर पोलीस स्टेशन यांनी केले.