ओतूर (पुणे) : शेतमालाला बाजारभाव नाही. कर्जबाजारीपणा, अतिवृष्टी, अस्मानी संकटामुळे जुन्नर तालुक्यात आत्महत्येचे लोन आलेले आहे. सरकारचे श्राद्ध घालण्यासाठी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सरकारचे श्राद्ध घालण्यासाठी कांदा व ऊस परिषदेचे आयोजन केले आहे, असे प्रतिपादन कांदा व ऊस परिषदेत महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे व राष्ट्रीय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी येथे परिषदेत केले.
या परिषदेसाठी राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यात क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजीराव नांदखिले, महिला आघाडी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षा वर्षाताई काळे, पुणे जिल्हा अध्यक्ष वस्ताद दौंडकर, उपाध्यक्ष अँड. अजित काळे कार्याध्यक्ष कालीदास आपेट, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पांडुरंग रायते, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, पुणे युवा आघाडीचे बाबा हारगुडे, लक्ष्मण शिंदे जिल्हा संघटन अंबादास हांडे, जुन्नरचे कार्याध्यक्ष तानाजी बेनके, सीताबाई पानसरे, जुन्नर तालुक्यातील शेतकरी संघटनेचे अजित वालझडे अजित वाघ, संभाजी पोखरकर, राजेंद्र शिंदे, डॉ. दत्ता खोमणे, राजूशेठ बनकर, अप्पा महराज दिघे, किसान सेलचे रमेश शिंदे, गुलाब फलफले, रवींद्र लोहटे, प्रवीण डोंगरे, प्रमोद खांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रतिमांचे पूजन रघुनाथ दादा पाटील यांच्या हस्ते करून आत्महत्या केलेल्या शेतकरी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जुन्नर तालुका शेतकरी अध्यक्ष संजय भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले आज शेतकरी दिशाहीन आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत त्यावर सत्ताधारी व विरोधी पक्षनेते बोलत नाही.
रेणुका ओझरकर, बाळासाहेब घाडगे, वर्षा काळे, लक्ष्मण शिंदे, नाना पाटील ब्रिगेडचे शिवाजीराव नांदखिले यांनी मनोगते व्यक्त केली. नांदखिले यांनी केंद्र व राज्य सरकार यांच्या शेतकरी धोरणावर खरमरीत टीका केली. या राजकारण्यांच्या घरात कोणी आत्महत्या केली आहे का असा प्रश्न उपस्थित केला.
राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सरकार फक्त आश्वासन देत आहे. त्या खोट्या आश्वासनाला आपण बळी जातो शेतकऱ्यांच्या शेतात वीज मंडळाची डीपी टोलचे ताण खांब गेले आहेत. त्यांचे भाडे मिळाल्याशिवाय वीज बिल भरू नका त्यांच्याकडे मागणी करा असे विचार मांडले
रघुनाथ दादा पाटील यांनी कांद्यावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवावी स्वामीनाथन आयोगाप्रमाणे प्रती किलो ३० रुपये भाव मिळालाच पाहिजे तसेच २ साखर कारखान्यातील हवाई अंतराची अट रद्द झाली पाहिजे. रंगराजन समितीप्रमाणे शेतकऱ्यांना ७०/३० टक्केप्रमाणे उसाचे पैसे मिळावे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी होऊन त्यांचा ७/१२ कोरा झाला पाहिजे व विशेष म्हणजे जुन्नर तालुका ओला दुष्काळ जाहीर करावाच. ही आत्महत्या केलेल्या शेतकरी वर्गाला श्रद्धांजली होईल.